spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नाना पटोले यांच्या पाठपुराव्याला यश; मका खरेदीसाठी खासगी गोदामांना मान्यता

हंसराज,भंडारा :- जिल्ह्यासह विदर्भातील मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून, मका खरेदी प्रक्रियेसाठी खासगी गोदामांचा वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून रखडलेल्या मका खरेदीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मका खरेदी केंद्रांवर उपलब्ध गोदामांची कमतरता असल्याने शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी आणताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. परिणामी खरेदी प्रक्रियेत विलंब होत होता आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन माजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मका खरेदी सुरळीत व्हावी तसेच गोदामांच्या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी वारंवार केली होती.

या पाठपुराव्याची दखल घेत शासनाने खासगी गोदामांचा वापर मका खरेदीसाठी करण्यास परवानगी देणारा आदेश जारी केला आहे. त्यामुळे खरेदी केंद्रांवरील साठवणुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असून शेतकऱ्यांचा मका वेळेत खरेदी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे भंडारा, गोंदिया तसेच विदर्भातील हजारो मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शेतकरी हिताच्या या निर्णयासाठी आमदार नाना पटोले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

Popular Articles