तिरोडा :- तालुक्यातील घोगरा गावात काही दिवसांपूर्वीच महेश सुभाष सहारे या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबावर विपरित परिणाम झाला. एकुलता एक मुलगा असल्याने, महेश त्याच्या कुटुंबाचा एकमेव कमावता होता. त्याला आई, वडील आणि पत्नी होती. महेशचा अपघाती मृत्यू कुटुंबासाठी एक भयानक धक्का होता, ज्यामुळे त्यांना त्यांच्या मुलाच्या निधनाने खूप दुःख झाले. त्यांच्या मुलाच्या निधनाने कुटुंबाचा आधारच हरपला गेला. आता आधार कोण देणार हि कुटुंबाला चिंता होती. अशा परिस्थितीत, घोगरा येथील नवतरुण क्रिकेट क्लब सर्व सदस्य मदतीसाठी धावून आले. महेशच्या वडिल व आईला ₹४१,००० ची आर्थिक मदत केली . ज्यामुळे त्यांना काही दिवस उदरनिर्वाहासाठी मदत होईल .यावेळी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष संजय भांडारकर, पप्पू भांडारकर, नव तरुण युवक क्रिकेट क्लब चे शरद भांडारकर, किशोर भोंडेकर शुभम खळोदे , सागर भांडारकर, प्रशांत भांडारकर, गोलू शहारे आदी सदस्य उपस्थित होते.








