Home Latest News शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, सामाजिक सलोखा धोक्यात : शरद पवारांची केंद्र-राज्य सरकारवर टीका

शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, सामाजिक सलोखा धोक्यात : शरद पवारांची केंद्र-राज्य सरकारवर टीका

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नाशिक &colon;- <&sol;strong>राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये झालेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात केंद्र आणि राज्य सरकारवर तीव्र हल्ला चढवला&period; शेती&comma; परराष्ट्र धोरण आणि आरक्षण या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी सरकारला जाब विचारला&period; पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले&period; &OpenCurlyDoubleQuote;पाकिस्तान&comma; नेपाळ&comma; बांगलादेश आणि श्रीलंका—हे शेजारी देश भारतासोबत उभे नाहीत&period; बांगलादेशालाही आपण स्वातंत्र्य मिळवून दिले होते&comma; तरी तो आज आपल्यापासून दूर आहे&period; अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे प्रत्येक वस्तूवर कर लावण्याची होती&period; अशा पार्श्वभूमीवर मोदींनी परराष्ट्र धोरणाबाबत गंभीर विचार करणे गरजेचे आहे&comma;” असे ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर&comma; पण सरकार उदासीन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>पवार म्हणाले की&comma; केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही&period; &OpenCurlyDoubleQuote;शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही&comma; कांदा निर्यातीवर निर्बंध आहेत&period; नाशिक जिल्हा बँक प्रचंड थकबाकीत आहे&period; शेतकऱ्यांची स्थिती बिकट होत असून&comma; त्यांची संघटना अधिक प्रभावी करण्याची गरज आहे&comma;” असे ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>नाशिक हा आधुनिक शेतीतील प्रयोगशील जिल्हा असून&comma; शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी आंदोलनाची सुरुवातही इथूनच झाली होती&comma; अशी आठवण त्यांनी करून दिली&period; मराठा आणि ओबीसी आरक्षणामुळे राज्यात निर्माण झालेल्या तणावावर बोलताना पवार म्हणाले&comma; &OpenCurlyDoubleQuote;महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवायला लागली आहे&period; हैदराबाद गॅझेटमधील तरतुदींमुळे बंजारा समाजासारख्या इतर समाजांना आदिवासी दर्जा मागण्याची प्रेरणा मिळाली असून&comma; यामुळे समाजात कटुता वाढू शकते&period;”<&sol;p>&NewLine;<p>राज्य सरकारने नेमलेल्या आरक्षण समित्यांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली&period; &OpenCurlyDoubleQuote;सरकारच्या समित्या कधीही एका समाजापुरत्याच नसाव्यात&period; मात्र ओबीसी समितीला चंद्रशेखर बावनकुळे आणि मराठा समितीला मराठा समाजाचेच नेते नियुक्त केले आहेत&period; ही चुकीची पद्धत आहे&comma;” अशी टीका त्यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>गांधी-नेहरू विचारधारेवर चालणारा पक्ष<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>पवारांनी नाशिकचा गौरवशाली इतिहासही कार्यकर्त्यांना आठवून दिला&period; &OpenCurlyDoubleQuote;आपला पक्ष गांधी-नेहरू विचारधारेवर चालणारा आहे&period; महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरूंची वर्किंग कमिटी बैठक नाशिकमध्येच झाली होती&period; तसेच महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा नेता देण्याचे श्रेयही नाशिकला आहे&comma;” असे ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyDoubleQuote;भारत-चीन युद्धकाळात पंडित नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांना संरक्षणमंत्री केले&period; त्यांनी पदाची शपथ घेताच चीनने सैन्य मागे घेतले&period; ते नाशिक जिल्ह्यातून बिनविरोध खासदार म्हणून निवडून गेले होते&comma;” अशी ऐतिहासिक आठवणही त्यांनी कार्यकर्त्यांना करून दिली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version