spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघाची नवीन कार्यकारणी घोषित 

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील  दिनेश दखणे यांची अध्यक्ष तर सावित्रीबाई फुले विद्यापीठातील  संतोष मदने यांची महासचिव म्हणून निवड 
नागपूर ०८  : महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघाची राज्यस्तरीय सभा नागपूर येथे रविवार, दिनांक ६ जुलै २०२५ रोजी पार पडली. या सभेत महासंघाचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन कोळी यांनी नवीन कार्यकारणी तयार करण्याबाबत सुचविले. त्याला सभेने मान्यता दिली. त्यानुसार महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघाची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली. या सभेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंकेक्षण विभागातील अधीक्षक  दिनेश दखणे यांची अध्यक्ष तर सावित्रीबाई फुले विद्यापीठातील संतोष मदने यांची महासचिव म्हणून निवड करण्यात आली.
नागपूर येथे आयोजित महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघाच्या बैठकीला महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठातील तब्बल ५५ प्रतिनिधी उपस्थित होते. सभेत विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. नवीन निवड करण्यात आलेल्या कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून ३ विद्यापीठातील प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील  सतीश वाघमारे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील  प्रेम मंडपे व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील आयुष्यमान कडबा हनवते यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. महासंघाचे महासचिव म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संतोष मदने कार्याध्यक्ष म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील  अरुण सपकाळे यांची तर कोषाध्यक्ष म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील  राजीव सोनवणे व सहाय्यक कोषाध्यक्ष म्हणून लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपूर येथील डॉ. चंद्रमणी सहारे यांची निवड करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्न सोबतच कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा आयोजित करणे विद्यापीठ व अनुकंपावरील स्थगित भरती या सोबतच एनपीएस या पेन्शन योजनेबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्वश्री दर्पणजी गजभिये, मनोज इंगळे, आनंद गटलेवार, शरद बागळे, रमेश शेवारे, माधव इंगळे, राजेश नानोटकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.

Popular Articles