spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रंगपंचमी (धुलीवंदन) च्या शुभ पर्वावर चाचेर येथे नऊ अंकी नाटकाचे आयोजन

किशोर साहू, मौदा :- रंगपंचमी (धुलीवंदन)च्या शुभ पर्वावर दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजार चौक चाचेर परिसरात लक्ष्मीनारायण देवस्थानातर्फे नऊअंकी नाटक “भाई का भाई पर इल्जाम”ची प्रस्तुती करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी पंचायत समिती सभापती यांचे पती तथा शिवसेनेचे जि प चे भावी उमेदवार कृष्णा टिकले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी जि प सदस्य तथा भाजपचे जि प चे भावी उमेदवार कैलास बरबटे, माजी सरपंच तथा काँग्रेसचे जि प चे भावी उमेदवार मदन बरबटे, महेश कलारे , शैलेश कोपरकर , भाजपा महामंत्री अशोक बावनकुळे,डॉ. बाबा शेख, वहाब अली, नासिर छवारे, कवडू मेश्राम,सुरेंद्र टेंबरे, बंडु बावणे, अशोक डदुरे, लक्ष्मण कामळे,प्रभाकर दरवई, वासुदेव सोमकुवर,प्रकाश काळे, ज्ञानेश्वर नाकाडे,कृष्णा नागमोते,तुळशीराम खडसे,बेनी मोहने,भोला बावनकुळे, पराग किरपान,शेखर देवगडे,रामा देशमुख , लक्ष्मण कांबळे, रितेश महादुले ,भोला बरबटे , प्रियबालक सोमकुवर, उमेश महादुले सह मोठया प्रमाणात मान्यवर व प्रेक्षकवर्ग उपस्थित होते.

Popular Articles