Tuesday, April 28, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

श्री सती अनसूया मातेच्या अभंगाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर :- श्रीक्षेत्र पारडसिंगा येथील श्री सती अनसूया मातेच्या जीवनचरित्रावर आधारित अभंगाचे लोकार्पण केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. संकल्पना राहुल बोंद्रे यांची आहे. लवकरच हा अभंग भाविक, रसिकांच्या भेटीस येणार आहे. या अभंगाचे संगीत दिग्दर्शन मनीष उपाध्ये यांनी केले असून अंशू बुटी यांनी गायन केले आहे. या अभंगाचे शब्द गीतकार अँड. माधव बोबडे यांचे असून संगीत संयोजन नीरज तातेकर यांनी केले आहे. याप्रसंगी राहुल बोंद्रे, पंकज चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. यासोबतच श्री अनसूया मातेच्या मंदिरात (पारडसिंगा) येथे हा अभंग मंदिर परिसरात रोज भाविकांना श्रवण करता यावा यासाठी मंदिराचे अध्यक्ष आमदार चरणसिंग ठाकूर यांना सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी अनेक भक्तगण व संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.