spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नितीन इंदूरकर सेनेच्या विशिष्ट सेवा मेडलने पुरस्कृत

नागपूर :-  दिनांक 12 फेब्रुवारी मुळ नागपूर निवासी मेजर जनरल निवृत्त नितीन राम इंदुरकर यांना विशिष्ट सेवा मेडलने एका विशेष कार्यक्रमात नुकतेच पुरस्कृत करण्यात आले.

अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात मेजर जनरल नितीन राम इंदुरकर यांचेसह एकूण 14 अधिकाऱ्यांना विविध सेवा मेडल प्रदान करून गौरविण्यात आले.

शांतता काळातील देण्यात येणारे हे पुरस्कार दक्षिण कमान चे प्रमुख जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या शुभहस्ते देण्यात आले.

येथे उल्लेखनीय आहे की नितीन इंदुरकर यांना यापूर्वीही त्यांच्या वैशिष्ट पूर्ण कामगिरीबद्दल सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल द्वारे गौरविण्यात आले असून सेनासेवीतील हे तिसरे मेडल ही त्यांच्या नावे नोंदल्या गेले आहे.

नितीन इंदुरकर हे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वनवासी कल्याण आश्रमाचे विदर्भ विभागाचे संरक्षक, माजी मुख्यवनसंरक्षक राम नारायण इंदूरकर (भावसे) यांचे पुत्र असून भामसंघ प्रणित एल ओ बी डब्लू चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष बँक कर्मचारी कामगार नेते विनायक इंदुरकर जेष्ठ पत्रकार विश्वास इंदूरकर भाजपा महानगरा चे सक्रिय पदाधिकारी कार्यकर्ते विवेक इंदुरकर यांचे चुलत बंधू होत. नितीन इंदुरकर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे मित्र मंडळ व नातेवाईकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.