spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गडचिरोली जिल्ह्यात हिवताप नियंत्रणासाठी ‘मलेरियामुक्त गडचिरोली अभियान’

– “मच्छर से टक्कर-बुखार से मुक्ती” जनजागृती अभियानास सुरुवात

गडचिरोली :- 10 फेब्रुवारी 2026 रोजी आरोग्य विभाग गडचिरोली आणि गोदरेज मार्फत EMBED प्रकल्प फॅमिली हेल्थ इंडिया संस्थेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली, सुहास गाडे, व डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली यांचे उपस्थितीत तसेच डॉ. प्रफुल गोरे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली, डॉ. सुजिता वाडिवे, जिल्हा हिवताप अधिकारी गडचिरोली, डॉ. पंकज हेमके तालुका आरोग्य अधिकारी, धानोरा यांचे मार्गदशनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील वाढत्या किटकजन्य आजारावर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भव्य चित्ररथ मोहिमेची सुरुवात केली. यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचे उपस्थितीत होते.

याप्रसंगी सहा भव्य असे जनजागृतीपुरक रथ काढण्यात आले. सदर चित्ररथ संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात फिरविण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचे प्रमाण कमी करण्यात निश्चितच यश मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

हिवताप (मलेरिया) रोगावर मात करण्यासाठी तसेच असे किटकजन्य रोग होऊ नये म्हणून घ्यावयाची खबरदारी हे हया चित्ररथाच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत माहिती पोचविण्याचे एक प्रभावी माध्यम होईल, असा विश्वास आरोग्य यंत्रणेने दर्शविला आहे.

या चित्ररथफेरीच्या प्रसंगी जिल्हा परिषद कार्यालयातील व जिल्हा हिवताप कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles