– मनपा आयुक्तांनी घेतला हनुमान नगर व धंतोली झोन चा आढावा
नागपूर :- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हनुमान नगर झोन आणि धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या नियमित स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन, मच्छरांसाठी धूर फवारणी, सिव्हर लाईन चोकेज, विहिरींची स्वच्छता, घराघरातून गोळा करणार येणारा कचरा, आदी समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी हनुमान नगर झोन आणि धंतोली झोन कार्यालयात नगरसेवक आणि मनपा अधिकारी यांची शुक्रवारी (ता.२६) बैठक पार पडली.
नागपूर महानगरपालिकेच्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हनुमान नगर झोन कार्यालयात झालेल्या प्रभाग क्रमांक २९,३१,३२,३४ च्या बैठकीत मनपाच्या उपमहापौर लिला हाथीबेड, मनपा आयुक्त डॉ.विपीन, यांच्यासह झोन सभापती ज्योती देवघरे, अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, नगरसेवक योगेश मडावी, अजय बोढारे, गणेश चर्लेवार, चंद्रकांत खंगार, मंगला मस्के, मानसी शिमले, सानवी तरुडकर (शेंडे), रितेश पांडे, रुपाली ठाकुर, राम कुंभलकर,नागेश मानकर, संजय ठाकरे, मनीषा नगरधनकर, बाबाराव तायडे, मनपाचे उपायुक्त निर्भय जैन, मगेश खवले, झोनचे सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर, मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बारहाते, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानी , श्रीकांत वाईकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत सर्वप्रथम आयुक्तांनी झोनचा विभाग निहाय आढावा घेतला. यावेळी उपमहापौर लिला हातीबेड यांनी आपल्या प्रभातील समस्या अवगत करून दिल्या. तर झोन सभापती ज्योती देवघरे यांनी झोन मध्ये आवश्यक मनुष्यबळ, साधनसामुग्री सह इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचे सूचना दिल्या. याशिवाय उपस्थित सर्व नगरसेवकांनी सक्शन मशीन, २ जेसीबी मशीन, विहिरी सफाईसाठी लागणारे मशीन फॉगिंग मशीन, लहान गल्ली सफाईसाठी लागणारे अत्याधुनिक लहान रोबोट यासह सफाई कर्मचारी यांची झोन मध्ये आवश्यकता असल्याचे सांगितले.
याशिवाय मनपाच्या धंतोली झोन कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रभाग क्रमांक १७,३३,३५ च्या बैठकीत आयुक्त डॉ. विपीन, झोन सभापती भारती बुंदे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अंकित अतिरिक्त आयुक्त. मिलिंद मेश्राम, उपायुक्त निर्भय जैन मंगेश खवले, अधीक्षक अभियंता डॉ.श्वेता बॅनर्जी, नगरसेविका श्रीमती सुजाता कोंबाडे, नगरसेवक सुहास नानवटकर, नगरसेविका कांचन चव्हाण, नगरसेवक मनोज साबळे नगरसेवक अंकीत चौधरी, नगरसेवक मनोज गावंडे, नगरसेविका शीला तराळे, नगरसेविका पूजा भुगावकर, नगरसेविका विशाखा मोहोड, नगरसेवक रमेश भंडारी, धंतोली झोनचे सहाय्यक आयुक्त प्रमोद वानखेडे कार्यकारी अभियंता अनिल गेडाम यांच्या सह इतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत सर्वप्रथम आयुक्तांनी झोनचा विभाग निहाय आढावा घेतला. यावेळी झोन सभापती भारती बुंदे यांनी धंतोली झोन मधील नियमित सफाईचा अभाव गटर लाइन चौकेज, कर्मचाऱ्यांची कमतरता आधी समस्यांवर लक्ष वेधले. तसेच उपस्थित सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागात दररोज नियमितपणे कचरा संकलन वाहने घरोघरी यावीत. आवश्यक त्या ठिकाणी यंत्रसामग्री वाढवावी. आवश्यक त्या ठिकाणी चे अतिक्रमण काढावे आदी सूचना दिल्या.
यावर नगरसेवकांचे प्रश्नांचे उत्तर देताना आयुक्त डॉ. विपीन यांनी सांगितले की, सफाई चे काम न करणाऱ्या सफाई कर्मचारी यांच्यावर थेट कारवाई करण्यात येणार असून, सफाई कर्मचारी यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसेच मनपात कार्यरत वाहन चालकांचे नेत्र तपासणी केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. याशिवाय नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर आणि वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांवर पोलिसांत थेट एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयुक्त डॉ विपीन यांनी स्पष्ट केले. याशिवाय मनपाच्या उपद्रव शोध पथकात मनुष्यबळ वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अमृत २ योजना अंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी केलेले खोदकाम पुन्हा तसेच करून द्यावे, अशुद्धपाणी येत असलेल्या ठिकाणी त्वरित उपाययोजना करावी. नागरिकांनी घरातील कचरा व इतर वस्तू नदी नाल्यात न टाकण्यासाठी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांसह मिळून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन आयुक्त यांनी केले.




