spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शुक्रवारी १४ ऑगस्टला राष्ट्रजागृती प्रतिष्ठान द्वारे अखंड भारत संकल्प दिनानिमित्य सामूहिक वंदे मातरम गायन सोहळा

– मध्य नागपुरातील ५ हजार विद्यार्थी करणार राष्ट्रभक्तीचा जागर

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची विशेष उपस्थिती

नागपूर :- राष्ट्रजागृती प्रतिष्ठान मध्य नागपूर द्वारे वंदे मातरम राष्ट्रगानाला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि अखंड भारत संकल्प दिनानिमित्त शुक्रवार दि १४ ऑगस्ट २०२६ ला अयाचित मंदिर बस स्टॉप, लाकडी पूल चौक, महाल येथे सकाळी ७.३० वाजता ३४ शाळेतील ५ हजार शालेय विद्यार्थ्यांचा सामुहिक वंदे मातरम्’ गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना व युवा पिढीला भारताचा गौरवशाली इतिहास माहिती व्हावा व अखंड भारताविषयी जागरूकता निर्माण होऊन राष्ट्रप्रेम जागृत व्हावे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा कार्यक्रम भव्य प्रमाणात आयोजित केलेला असून सुमारे *मध्य नागपुरातील ३४ शाळा व कॉलेजचे ५ हजार विद्यार्थी सामूहिक वंदे मातरम चा जागर करणार आहेत. याप्रसंगी धनुष कोंडी भारत ते श्रीलंका येथे समुद्र जलतरण २९ किमी अंतर ११.१५ तासात पूर्ण केल्याच्या विश्वविक्रमाची नोंद केलेल्या नागपूरची सुपुत्री ईश्वरी कमलेश पांडे हिचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते सन्मान करण्यात येईल.

या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी व प्रमुख वक्ता म्हणून भारत सरकारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मार्गदर्शन करतील. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील उपस्थित असतील. याप्रसंगी नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे, भाजपा नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी , विधान परिषदेचे आमदार संजय भेंडे, आमदार डॉ राजीव पोतदार, आमदार परिणय फुके, आमदार कृष्णाजी खोपडे, आमदार मोहन मते, माजी आमदार गिरीश व्यास, विकास कुंभारे, नागो गाणार, अशोक मानकर, आदी मान्यवर उपस्थित राहतील. विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील.

या कार्यक्रमाची संकल्पना आमदार प्रवीण दटके यांची असून कार्यक्रमाला यशवितेसाठी राष्ट्रजागृती प्रतिष्ठानचे संयोजक संजय चिंचोळे, जयंत पाध्ये, डॉ श्रीरंग वराडपांडे, आशिष भुते, नीरजा पाटील, भूषण घुई, मंगेश वड्याळकर, पंकज साळुंके, राजश्री गोरे, सदाशिव देहद्राय, सचिन कावळे, कुणाल गडेकर, व मध्य नागपूर चे पदाधिकारी परिश्रम घेत असून नागरिकांनी मोठया संख्येत उपस्थित राहून देशभक्तीचा जागर उत्साहात करावा असे आवाहन आयोजन समिती द्वारे करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.