spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खात येथे‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या निमित्ताने माजी भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल यांनी सपत्नीक स्वगृही व प्रतिष्ठान येथे फडकविला तिरंगा 

किशोर साहू,मौदा :- तिरंगा हा केवळ आपल्या देशाची ओळख नाही, तर तो आपल्या स्वातंत्र्याचा, शौर्याचा आणि राष्ट्राभिमानाचा प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यवसायाच्या ठिकाणी असो किंवा आपल्या घराच्या अंगणात, प्रत्येक ठिकाणी राष्ट्राभिमानाची भावना जपण्याच्या हेतूने खात येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत माजी भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल यांनी सपत्नीक स्वगृही व त्यांचे प्रतिष्ठान गोपाल ट्रेडर्स येथे आज मंगळवार ( ता. 11 ऑगस्ट) ला राष्ट्रध्वज तिरंगा अभिमानाने फडकविला. यावेळी हर घर तिरंगा….. हर मन तिरंगा अशा घोषणाही देण्यात आल्या

यावेळी भाजपा मौदा तालुक्याचे माजी अध्यक्ष मुकेश अग्रवाल, नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या राधा मुकेश अग्रवाल, खातचे माजी सरपंच कैलास वैद्य, खातचे उपसरपंच रवींद्र मांडरकर, ग्रामपंचायत सदस्य अरविंद तांबुलकर, नाना राखडे, कुणाल पंचबुद्धे, प्रफुल्ल इरपाते, अश्विन गुरुभेले, सूरज वैद्य, सूरज देवगडे उपस्थित होते.

‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरात आणि प्रत्येक मनात राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ होत असल्याने खात – रेवराल जिल्हा परिषद सर्कल व मौदा तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आव्हान माजी भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल व माजी जिल्हा परिषद सदस्या राधा अग्रवाल यांनी केले आहे.

Popular Articles