spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ओव्हरटेकची एक चूक अन् घात झाला! एकाच्या मृत्यू, दुसरा जखमी

सचिन चौरसिया प्रतिनिधी रामटेक :- नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर दुचाकीवरून दोन व्यक्ती जबलपूर कडून नागपूरला जाताना चोरबाहुली शिवारात कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीला धक्का लागल्याने इंद्रकुमार भालेकर (वय ५०) या व्यक्तीच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरा जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवार (दि.१२) ला सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या दरम्यान घडला. मिळालेल्या माहितीनुसार, मौजा चोरबाहुली शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -४४ वर सकाळी ८.१५ वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. एमपी-२२-झेडजी-०७२८ क्रमांकाची मोटारसायकल चालवत विजय भिमराव गेडाम (वय २३, रा. ताकलाकला, ता. बरघाट, जि. सिवनी, मध्यप्रदेश) हा जबलपूरकडून नागपूरकडे येत होता. त्याच्या मागे इंद्रकुमार भालेकर (वय ५०, रा. मोहगाव, ता. बरघाट, जि. सिवनी) बसले होते. दरम्यान, चोरबाहुली शिवारात समोर जाणाऱ्या कंटेनरला डिव्हायडरच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना मोटारसायकलचा कंटेनरला धक्का लागला. त्यामुळे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटून दोघेही रस्त्यावर कोसळले. या अपघातात चालक विजय गेडाम याच्या डोक्याला व उजव्या हाताला दुखापत झाली, तर मागे बसलेले इंद्रकुमार भालेकर गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाजा, खुमारी येथील कर्मचारी डॉ. लखन हनवत, प्रवीण ठाकूर व नितेश नेवारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे हलविले. मात्र उपचारादरम्यान इंद्रकुमार भालेकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवलापार पोलीस ठाण्यात आरोपी चालक विजय गेडाम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ), १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहेत.

Popular Articles