नागपूर :- ऑरेंज सिटी वॉटर (OCW) यांचा अलीकडेच आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभाग प्रस्तुत साप्ताहिक कार्यक्रम ‘दृष्टीक्षेप’ या विशेष भागात सहभाग झाला. या भागाचा विषय होता; “नागपूर शहरातील पाणीपुरवठा आणि ऑरेंज सिटी वॉटरची भूमिका.”
या विशेष संवादामध्ये कुशल अतकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ऑरेंज सिटी वॉटर यांनी नागपूरच्या पाणीपुरवठा व्यवस्थेची माहिती, नागरिकाभिमुख उपक्रम तसेच भविष्यातील विकास आराखड्यांबाबत सविस्तर माहिती दिली.
या मुलाखतीचे सूत्रसंचालन रेवती जोशी यांनी केले.
नागरिकांनी ही मुलाखत खालील लिंकवर ऐकू शकता –
🔗 https://www.youtube.com/watch?v=Zg2zWECgtW4
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.








