spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

१० दिवसीय रोजगार कौशल्य कार्यशाळेचे आयोजन

सचिन चौरसिया रामटेक ०९ :  कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी अँड सायंस (किट्स) रामटेक मध्ये रोजगार कौशल्य या विषयावर १० दिवसीय कार्यशाळेचे उद्‌घाटन प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांचे हस्ते ७ जुलाई २०२५ ला झाले. कार्यशाळा मधे ७ व्या सेमिस्टरच्या विविध विभागातील ३०० विद्यार्थी सहभागी होणार आहे.पहिल्या स्लॉट मध्ये कॉम्प्युटर आणि मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी सहभागी असतील. उद्घाटन प्रसंगी प्रामुख्याने किट्स चे प्लेसमेंट अधिकारी डॉ. श्रीकृष्ण चिंचोळकर, मेकैनिकल विभाग प्रमुख डॉ. यशवंत जिभकाटे, डीन व कंम्पुटर विभाग प्रमुख डॉ. विलास महात्मे, केयोर कोइंबटतूर चे  रामादोराई सहित इतर शिक्षक गण, इतर विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
१० दिवसीय रोजगार कौशल्य कार्यशाळा मध्ये केअर कोइंबतूर व बंगलोर चे प्रशिक्षक रामादोराई, डॉ. श्रिप्रीया अशोक, जे. दिनकर, सुधीर नाईक, दिनेश जोशी, के. व्ही. वेंकटेश विद्यार्थ्यांना विविध कंपण्या मध्ये नौकरी करीता यशस्वीरीत्या साक्षात्कार कसा द्यावा या बद्दल मार्गदर्शन करतील. तसेच समुह चर्चासत्र, प्रभावी संचारमाध्यम, स्वयंप्रबंधन, कौशल्य प्रबंधन, टिम वर्क इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करतील. प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे म्हणाले की १० दिवसीय कार्यशाळा मुळे विद्यार्थ्यांना विविध रोजगार संबंधित कंपण्यामध्ये साक्षात्काराला समोरे जातांना मदत मिळेल. प्रस्तावना डॉ. श्रीकृष्णा चिंचोळकर यानी केली. ते म्हणाले की या वर्षी विविध नामांकित कंपन्यामध्ये किट्स च्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला. संचालन व धन्यवाद प्रा.जोतस्ना चव्हान यांनी केले

Popular Articles