Home Blog Page 1830

मेडिकल चौकात राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळा उभारण्यात यावा, आक्रमण केले धरणा आंदोलन.

0
नागपूर 28 :  मेडिकल चौक येथे आक्रमण युवक संघटना तर्फे राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या 151 व्या जयंती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजीत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल या पुस्तकाचे लेखक व पत्रकार मिलिंद किर्ती मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होते. त्याच सोबत सामाजिक कार्यकर्ता पूजाताई नाखले, अलकाताई माटे, रवींद्र पाटील, आक्रमणचे जिल्हा संयोजक ओपूल तामगाडगे, कार्याध्यक्ष विशाल बनसोड व जिल्हाध्यक्ष धनराज हाडके उपस्थित होते. सर्व प्रथम शाहू महाराजांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला समाज प्रबोधनकार अविनाश साखरकर यांनी आंबेडकरी आंदोलनावर गीत गायन करून वातावरण पेटवले, कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मिलिंद कीर्ती यांनी आपल्या प्रमुख भाषणामध्ये बोलताना राजश्री छत्रपती शाहू महाराज हे बहुजनांचे राजे होते त्यांनी आपल्या संस्थानात सर्वप्रथम ५० टक्के आरक्षण देऊन सामाजिक न्याय देण्याचे काम केले,. शाहू महाराजांनी माणगावच्या परिषदेमध्ये दलितांनी आपला नेता निवडला असून बाबासाहेब आंबेडकर आपला उद्धार एक दिवस करतील असे भाकीत शाहू महाराजांनी केले होते, शाहू महाराजांनी आपल्या राजवटीत अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्था व हॉस्पिटल तयार केले होते. त्यामुळे देशाला आज खरी गरज शाहू महाराजांच्या कार्याची विचारांची आहे. आक्रमण संघटन हे लढवय संघटन असून अनेक असे अन्याय अत्याचार पीडित शोषित त्यांच्या पाठीमागे उभे राहणारे संघटन असून आक्रमण द्वारे मेडिकल चौक या ठिकाणी शाहू महाराजांच्या पुतळा उभारण्यात यावा या मागणीचे समर्थन सुद्धा त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. आक्रमणच्या सर्व कार्यकर्त्यांनी नारे निर्देशन घोषणा देऊन शाहू महाराजांच्या पुतळा मेडिकल चौकात लवकरात लवकर उभारण्यात यावा अन्यथा येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानभवनाचा घेराव करून मुख्यमंत्री व खासदार यांच्या रस्ता रोको आंदोलन करण्याच्या इशारा आक्रमणे या कार्यक्रमात दिला.
कार्यक्रमाच् सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष धनराज हाडके यांनी तर प्रास्ताविक ओपुल तामगाडगे यांनी मांडले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष रोशन ठवरे, शहर उपाध्यक्ष प्रफुल खोब्रागडे, जिल्हा कोषाध्यक्ष सुरज पुरानिक, जिल्हा सचिव अश्विन पाटील, समीर शाहू, अतिश शंभरकर, आदेश रामटेके ऋषी धोलारे, दीपक पाटील विकी वानखेडे, सनी शेंडे, दर्शन तामगाडगे, सुंदर भालावी, पंकज टवरे, श्रीकांत फुले, इत्यादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जयंती व धरणा प्रदर्शन कार्यक्रम पार पडला. शेवटी सर्वांचे  आभार झब्बु तामगाडगे यांनी मानले.

ग्रेस रिहॅब अँड वेलनेस सेंटर बुटीबोरी येथे ड्रग्ज विरोधी जागरूकता सप्ताहाचा समारोप.

0
नागपूर 28 : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज विरोधी दिनानिमित्ताने शहर पोलिसांद्वारे चालविल्या जाणाऱ्या ऑपरेशन थंडर आणि जनजागृती सप्ताह कार्यक्रमाचा समारोप गुरुवारी झाला. याप्रसंगी ग्रेस ॲडिक्शन लिबरेशन सेंटर बुटीबोरीच्या वतीने सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे निवृत्त डीन डॉ. विनय हजारे आणि डॉ. हरीस आत्राम यांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. ड्रग्ज व्यसनाचे दुष्परिणाम आणि आपण त्यातून कसे बाहेर पडू शकतो यावर चर्चा करण्यात आली. उपस्थित सहभागींनी या चर्चेत उत्साहाने भाग घेतला आणि दंत तपासणी देखील करण्यात आली. संस्थेच्या संस्थापक आणि आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या शिक्षिका डॉ.अर्चना भारती, अभय भारती, शशिकांत पुरी आणि कुसुमाई क्लिनिक यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

एडुसन फाऊंडेशन तर्फे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची १५१ जयंती साजरी.

0
नागपूर 28 : नवीन सुभेदार येथील एडुसन फाऊंडेशन तर्फे २६ जून रोजी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची १५१ वी जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक डॉ. निलेश काळे, सहसंचालक सरोज काळे उपस्थित होते. सरोज काळे यांनी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या शिक्षण क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल मुलांना माहिती दिली व या दिनाचे विशेष महत्व अधोरेखित केले. डॉ निलेश काळे यांनी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकून मुलांना सामाजिक बांधिलकी जपण्याकरिता प्रेरित केले.

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची  तातडीने अमंलबजावणी  करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

0
रु. 288.17 कोटींच्या  श्री क्षेत्र भिमांशकर विकास आराखड्यास मान्यता

मुंबई, दि. 28 – श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची अमंलबजावणी तातडीने सुरु करुन कुंभमेळ्याच्या आधी या क्षेत्राचा  सुनियोजितपणे  दर्जेदार  विकास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.

यावेळी श्री क्षेत्र भिमांशकर विकास आराखडा (कुंभमेळा 2027-गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी सुविधा) रु. 288.17 कोटींच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.

सह्याद्री अतिथिगृह येथे श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा संदर्भातील आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना सूचित केले. बैठकीस  सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी  मोठ्या संख्यने भाविक आणि पर्यटक येतात, त्यांना केंद्रबिंदू ठेऊन याठिकाणी विविध दर्जेदार सुविधा विकसित कराव्यात. कुंभमेळा सुरु होण्यापूर्वी श्री क्षेत्र भीमाशंकरच्या  विकासाचे काम पूर्ण करावयाचे आहे, त्यादृष्टीने विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा,  टाईमलाईन ठरवून काम सुरू करण्याचे निर्दैशित करुन मुख्यमंत्री म्हणाले की,
भीमाशंकर परिसराला लाभलेल्या नैसर्गिक सृष्टीसौंद्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन व्यापक प्रमाणात  येथे इको टुरिझम संकल्पना विकसित करण्यात यावी. मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या वनराईचा उपयोग करुन  वनभ्रमण पथ तयार करावे. त्याचसोबत पर्यटक,भाविकांसाठी रोप वे ची सुविधा विकसित करावी.  निगडाळे या ठिकाणी पर्यटकांसाठी  सोयीच्या ठरणा-या सर्व सुविधा हॉटेल, रेस्टॉरंट त्याचसोबत इच्छुकांसाठी  निवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. भीमाशंकर येथील दळणवळण सुविधा , वाहतूक मार्ग,अंतर्गत रस्ते यांच्या  विकासास प्राधान्य द्यावे. तसेच याठिकाणी  हेलीपॅड सुविधा उपलब्ध करुन देण्याचे ही नियोजन करावे.  या परिसराचा विकास करताना स्थानिक व्यावसायिक, दुकानदारांना नवीन दुकान दयावीत. तसेच राजगुरुनगर-तळेघ- भीमाशंकर महामार्ग हा सुरळित वाहतूक व्यवस्थेसाठी उत्तम पर्याय आहे , त्यादृष्टीने त्याचा विकास करण्यात यावा. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे पर्यटक भावीकांची होणारी गर्दी लक्षात घेता चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी,त्यासाठी अतिरिक्त  पोलिस चौकी या परिसरात उभारावी. तसेच  विनाखंड वीज पुरवठा सुविधा उपलब्धतेच्या दृष्टीने वीज उपकेंद्र ही याठिकाणी  दयावे.

यावेळी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकास कामांबाबत सविस्तर सादरीकरण केले.   बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, तसेच संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

अग्निशमन दलात अत्याधुनिक ८ नवीन फायर टेंडर दाखल शहरातील अग्निशमन व आपत्कालिन सेवा होणार अधिक सक्षम.

0

नागपूर, ता. 28  : नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत  शहरातील आगीच्या घटनांवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी विविध क्षमता असलेले ८ नवीन फायर टेंडर अग्निशमन ताफ्यात दाखल झाले आहे. तर उर्वरीत ६ मिनी फायर टेंडर लवकरच सेवेत दाखल होणार आहेत. शहरात नव्याने सुरू झालेल्या वाठोडा, पुनापूर व पाचपावली अग्निशमन केंद्राकरीता १४ नवीन अग्निशमन गाड्या (फायर टेंडर) सेवा देणार आहेत. यामुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या  क्षमतेत लक्षणीय वाढ झालेली आहे. उंच तसेच दूरवरून पाण्याचा मारा करून आग तात्काळ नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळणार आहे.

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच या फायर टेंडरचे लोकार्पण झाले. यावेळी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी. अतिरिक्त आयुक्त  अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अग्निशमन अधिकारी  तुषार बाराहाते यांच्या नेतृत्वात अग्निशमन विभागाचे आधुनिकीकरण केले जात आहे. या अंतर्गत नवीन फायर टेंडर अग्निशमन दलात दाखल झाल्याने अग्निशमन विभागाला अधिक बळ मिळाले आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालिन सेवा विभागाने खरेदी केलेल्या १४ फायर टेंडरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आणि क्षमतांचा समावेश आहे. याची किंमत १६ कोटी ४९ लाख रुपये इतकी आहे. १६ हजार लिटर पाणी  वाहून नेण्याची क्षमता असलेले ५ वॉटर बाउजर खरेदी करण्यात आले आहे. यामध्ये १००० फूट अंतरापर्यंत पाण्याचा मारा करण्याची सुविधा आहे. ३५ फूट उंच शिडी, आवश्यक साहित्याने सुसज्ज साहित्यामुळे आगीवर नियंत्रण आणणे सोपे जाणार आहे. याशिवाय ५ हजार लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेले ३ फायर टेंडर खरेदी करण्यात आले आहे. जवळपास १००० फूट पाईप तसेच ३५ फूट उंच शिडी, आवश्यक साहित्याने सुसज्ज अशी हे फायर टेंडर आहे. तर ६ मिनी फायर टेंडरची पाणी वाहून नेण्याची क्षमता २ हजार लीटर एवढी आहे. हे मिनी फायर टेंडर खरेदी करण्यात आले आहे. ५०० फूट पाईप, ३५ फूट उंच शिडी, आवश्यक साहित्याने सुसज्ज अशी  मिनी फायर टेंडर आत लहान अरुंद रस्त्यामध्ये जात असते.

शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी, बाजारातील अरुंद रस्ते असलेल्या वस्त्यातील आगीच्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी हे फायर टेंडर अग्निशमन विभागाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. वेगाने होणारे शहरीकरण आणि वाढत्या उंच इमारती यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या अग्निशमन विभागाला उभारी देण्याचा प्रयत्न मनपा प्रशासनाकडून केला जात आहे. अत्याधुनिक फायर टेंडरमुळे अग्निशमन विभाग सक्षम बनला आहे. वेगाने वाढणाऱ्या शहरात या नवीन फायर टेंडरमुळे आगीच्या घटना आटोक्यात आणण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहे.

 ७० मीटर हॅड्रोलिक प्लाटफॉर्म मशीन लवकरच ताफ्यात

अग्निशमन विभागाच्या नव्या 22 अग्निशमन केंद्राचा मास्टर प्लानमध्ये प्रामुख्याने गगनचुंबी इमारतींवर सेवा पोहोचविण्यासाठी अग्निशमन विभागाने फिनलॅण्ड येथून १३ कोटी१५ लाख रुपयांत ७० मीटर हॅड्रोलिक प्लॅटफॉर्म मशीन खरेदी केली असून, लवकरच ही यंत्रणा अग्निशमन दलाच्या ताफ्यात येणार आहे. या नव्या यंत्रणेमुळे आता शहरातील एखाद्या ७० मीटर पर्यंत इमारतीतील आग नियंत्रणात आणता येईल. तसेच आपत्कालीन स्थितीमध्ये या मजल्यावरील नागरिकांना सुरक्षितपणे खाली आणता येईल. सध्या अग्निशमन विभागाकडे ४२ मीटर  उंचीची १ टर्न टेबल लॅडर (टीटीएल) व ३२ मीटर उंचीची हॅड्रोलिक प्लाटफॉर्म (एचपी)मशीन, २ रॅपिड इंटरवेंशन व्हेइकल (आरआयवी),१  क्विक रिस्पॉन्स व्हेईल (क्युआरवी) आणि ४ बूलेट फायर फायटिंग बाईक सेवेत आहे. मनपाकडे १६हजार लिटरचे ७ वॉटर ब्राऊजर, ५ हजार लिटरचे १४ फायर टेंडर, ३हजार लिटरचे ४ मीनी फायर टेंडर असून यातील २ मिनी फायर टेंडर डम्पींग यार्डमध्ये आगीच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय २ हजार लिटरचे ४ मिनी टेंडर सेवेत आहे. उर्वरीत २हजार लिटरचे ६ मिनी फायर टेंडर लवकर सेवेत दाखल होणार आहे.

अग्निशमन केंद्रांची संख्या पोहोचणार २२ वर

शहराच्या लोकसंख्येनुसार महानगरपालिकेचे १२ अग्निशमन केंद्र कार्यरत आहेत. नुकतेच पाचपावली अग्निशमन केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. तसेच जुने अग्निशमन केंद्रांचे नूतनीकरण देखील या वर्षात होईल.  आणखी १० अग्निशमन केंद्रे उभारण्यात येणार आहे. यात  बजाजनगर, अंबाझरी, नरसाळा, मानेवाडा,  चिंचभवन, दाभा, वायुसेनानगर, ठाकरे लेआऊट, वांजरा व वांजरी या भागांमध्ये नवी अग्निशमन केंद्रे उभारण्यात येणार आहे. यानंतर शहरातील एकूण अग्निशमन केंद्रांची संख्या २२ वर पोहोचणार असून प्रक्रिया सुरु लकडगंज येथे नव्या अग्निशमन केंद्राच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून अत्याधुनिक सुविधायुक्त या अग्निशमन केंद्राच्या बांधकामावर १४.८९ कोटी खर्च करण्यात येणार असून प्रशासनाने मान्यता दिलेली आहे. तसेच सध्या प्रशासनाने अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेता व अतिवृष्टी कालावधीची दखल घेत प्रशिक्षीत  68  अग्निशमन विमोचक/ इनर्टन्स 4 महिन्याच्या कालावधी करिता विशेष मानधनावर नियुक्त केले आहे.

Felicitation of Mr Prasannakumar Nair Director Sree Ragam musical group Nagpur at Balgandharva Rang mandir Pune.

0
Nagpur 27 : Pune group invited Sree Ragam musical group Nagpur to perform at Balgandharva Rang mandir Pune during annual day celebration.Popular singer Swastika Thakur and Musicians team led by Parimal joshi gave a splendid performance with loud round of applause on each presentation. The Balgandharva Rang mandir officials felicitated Mr Prasanna kumar Nair and the team members.Mr Nair thanked the officials and Manisha Nischal & Mehak group for the warm reception and organizing such a wonderful event.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात दीर्घकालीन व पर्यावरणपूरक धोरण सादर करावे  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

0

मुंबई, दि. 28 : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा परंपरेनुसार व्हावे, यासाठी पर्यावरणाचा दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले व न्यायालयात टिकेल असे धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, मा. मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, प्रधान सचिव व विधी परमर्षी सुवर्णा केवले, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी सदस्य सचिव रविंद्र आंधळे आदी उपस्थित होते.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार राज्य शासनाने राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाकडून अहवाल मागविला होता. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी हा अहवाल दिला असून त्यात काही शिफारसी करण्यात आल्या होत्या. खोल समुद्रात मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यासंदर्भात अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचा अभ्यास करून न्यायालयासमोर बाजू मांडण्यात यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

तसेच सार्वजनिक गणेश विसर्जनानंतर समुद्र किनारे स्वच्छ करण्याची काळजी घेण्यासाठी ठोस उपाय आवश्यक आहेत, तसेच गणेश मूर्तीं तयार करताना पर्यावरणस्नेही सामुग्रीचा वापर व  नैसर्गिक रंगाचा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी दिले.
सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार म्हणाले की, सार्वजनिक गणेशोत्सव प्रथा परंपरेनुसार साजरा व्हावा व उंच व मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पर्यावरणपूरक मार्ग काढण्यात यावा. तसेच छोट्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात यावे. शाडूच्या व पर्यावरण पूरक सामग्रीचा वापर करून मूर्ती बनविण्यासंदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे.

डॉ. काकोडकर यांनी जल प्रदुषणाचा विचार करून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्यावर भर देण्यात यावा. रासायनिक रंगांमुळे जास्त प्रदुषण होते. त्यामुळे नैसर्गिक रंगाचा वापर करणे, पर्यावरणपूरक साहित्य वापरणे यावर भर देऊन जनजागृती करण्यासंदर्भात त्यांनी सूचित केले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आज इस्कॉन की जगन्नाथ रथ यात्रा.

0

न्यूयॉर्क अमेरिका के श्री कृष्ण चैतन्य स्वामी महाराज की विशेष उपस्थिति

नागपुर 28 : अंतर्राष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन के श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर गेट नंबर 2 एम्प्रेस मॉल के पीछे नागपुर की और से जगन्नाथ रथ यात्रा का आयोजन 28 जून 2025 को दोपहर 11.30 बजे किया जाएगा पोद्दारेश्वर राम मंदिर (मेयो हॉस्पिटल)। सर्वप्रथम कारों के काफिले से भगवान श्री जगन्नाथ भाई बलभद्र एवं बहन सुभद्रा के साथ एम्प्रेस सिटी स्थिति धर्म पुत्र युधिष्ठिर दास के निवास स्थान से कार्यक्रम स्थल सेंट्रल एवेन्यू स्थित चंद्रलोक बिल्डिंग के पास सुबह 10.30 बजे पधारेंगे। वहां सर्व प्रथम उनको 56 भोग लगाया जायेगा।
श्रील लोकनाथ स्वामी महाराज के त्रिदंडी सन्यासी शिष्य न्यूयॉर्क अमेरिका निवासी श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज की उपस्थिति में विशेष अतिथियों द्वारा रथ का पूजन एवं भगवान की महाआरती होगी।
इस्कॉन नागपुर के प्रवक्ता डॉ श्यामसुंदर शर्मा ने बताया कि आरती के पश्चात रथयात्रा पोद्दारेश्वर राम मंदिर (मेयो हॉस्पिटल चौक) से प्रारम्भ होकर सेवा सदन चौक, अग्रसेन चौक, लाल इमली चौक, वल्लभाचार्य चौक (नंगा पुतला),  खुले चौक, न्यू इतवारी रोड़, गांधी पुतला चौक, बच्छराज व्यास चौक (बड़कस चौक), गांधी गेट, थोड़ेश्वरी राम मंदिर, आज्ञाराम देवी चौक होते हुए इस्कॉन मंदिर पहुंचेगी। जगह जगह पर भगवान का सत्कार होगा विभिन्न प्रकार के भोग लगाए जाएंगे एवं चौराहों भक्तों द्वारा  विशेष आरती होगी। कई भक्तों भक्तों  द्वारा रास्ते में जलपान एवं स्वल्पाहार की व्यवस्था की गई है।
इस आयोजन की सफलता के लिए हरि कीर्तन प्रभु, ब्रजेन्द तनय प्रभु, विशाल प्रभु, वेणुगोपाल प्रभु, आराध्य भगवान प्रभु, नरहरि ठाकुर प्रभु, धर्म पुत्र युधिष्ठिर प्रभु, ,परम करुणा प्रभु, सचितनय गौर प्रभु, कल्पतरु प्रभु, गोपाल लीला प्रभु, जय कृष्ण प्रभु, साधना भक्ति माताजी, युगल नाम निष्ठा प्रभु, जय गिरधारी प्रभु, हेमंत ठाकरे प्रभु, राजेश  रैकवार प्रभु,पंढरीनाथ प्रभु, प्रसन्नजीत प्रभु,  कौशलेंद्र राम दास प्रभु, किंकर वैष्णव प्रभु, प्रथमेश प्रभु, ऋतिक मुनेश्वर प्रभु, अक्षय नागतोडे प्रभु इत्यादि प्रयासरत है। इस्कॉन नागपुर मैनेजमेंट ने नागपुर वासियों को आग्रह किया है कि वे अपने हाथों से रथ खींच कर इस अवसर का लाभ लें।

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 45 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई .

0

नागपूर, ता. 28 : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. )शुक्रवार (ता.27)  रोजी शोध पथकाने 45 प्रकरणांची नोंद करून 49,600/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 6,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 100/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हिस  प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2,000/-रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 08 प्रकरणांची नोंद करून 21,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा  अशा ठिकाणी जनावरे/ वाहने धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करून 1000/- रूपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून 5,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 21 प्रकरणांची नोंद करून 4,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 07 प्रकरणांची नोंद करून रु.7,000/- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

 तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. स्काय लाईन रियालिटी यांच्यावर बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले.धरमपेठ झोन अंतर्गत मे. नेगव तोमर यांनी रस्त्यालगत विनापरवानगी झोपडी उभारल्याबद्दल रु.10,000/- चे दंड वसूल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. एकविरा बिल्डर्स व मे.राई उद्योग बिल्डर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल प्रत्येकी  रु. 10,000/- या प्रमाणे 20,000/- रूपयांची  दंड वसूली करण्यात आली. नेहरूनगर झोन अंतर्गत ‌ रुषी पुटेवार यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे.आनंद  किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. तसेच एक्सेलेंट ट्युशन क्लासेस यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले.सतरंजीपुरा झोन अंतर्गत राजेश गजानन यांनी मनपाचे चेंबर गाडीने तोडल्यामुळे रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. आशीनगर झोन अंतर्गत मे. रेनायस्सन्स कॉलेज यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने 09 प्रकरणांची नोंद करून रू. 65,000/- दंड वसूल केला.

पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पा जवळील शासकीय जमिनींवर आर्थिक केंद्र विकसित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

0

 

वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा उत्तरवाहिनी रस्त्याच्या कामाचा आढावा

मुंबई, दि. 28 : पायाभूत सविधांचे विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्या जवळील शासकीय जमिनी चिन्हांकित करण्यात याव्यात. या शासकीय जमिनींचा ‘ बीकेसी’च्या धर्तीवर विकास करून नवीन आर्थिक केंद्र विकसित करावे, असे निर्देश  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृह येथे सागरी किनारा रस्ता उत्तर वाहिनी कामाच्या आढावा बैठकीत दिले. कांदळवनांचे संवर्धन करीत वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा उत्तर वाहिनी रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी  दिल्या.

सागरी किनारी रस्ता कामामुळे बाधित होणाऱ्या कांदळ वनापेक्षा अधिकचे कांदळवन वाढविण्यात यावे. प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या एकाच वेळी घेण्यात याव्यात. प्रकल्प निश्चित केलेल्या डिसेंबर 2028 कालावधी  पर्यंत पूर्ण करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, या रस्ता कामासाठी 165 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे.  यामध्ये बहुतांशी शासकीय  जमिन आहे. प्रकल्पाकरिता शासकीय जमीन हस्तांतरित करण्याची कार्यवाही यंत्रणांनी पुढील 15 दिवसात पूर्ण करावी. वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय विभागाची इमारत बाधित होत असल्यास विभागाकडे पाठपुरावा करून इमारतीची जागा प्राप्त करून घ्यावी. या सागरी किनारी मार्गाला मढ ते वर्सोवा जोड मार्ग एम.एम.आर.डी.ए सोबत समन्वय ठेवून तयार करावा.

हा सागरी किनारी रस्ता निर्माण करतानाच यावर जाहिरातीं साठी  फ्लेक्स,  होर्डिंगच्या संबंधाने नियोजन करावे.  त्यासाठी एका चांगल्या सल्लागाराची नियुक्ती करावी. जाहिरातींच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून रस्त्याच्या दुरुस्ती आणि व्यवस्थापनावरील खर्चासाठी तरतूद करता येईल, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

बैठकीस  बृहन्मुंबई महानगरपालिका  आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर,  ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मिरा भाईंदर मनपा आयुक्त श्री. शर्मा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.

वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारी मार्ग विषयी थोडेसे..

हा सागरी किनारी मार्गाचा मुख्य रस्ता 26 किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्याची जोडमार्गांसह एकूण लांबी 63 किलोमीटर आहे.  सागरी किनारी प्रकल्पाचे काम सहा पॅकेजेसमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी एकूण 165 हेक्टर जमीन लागणार आहे.