Home Blog Page 1829

पुराने वाहनों पर लगाया जा रहा हरित कर और जुर्माना कम किया जाए प्रगतिशील नागरी समस्या निवारण समिति का संविधान चौक पर प्रदर्शन.

0
नागपूर 28 : राज्य परिवहन विभाग द्वारा पुराने वाहनों पर लगाए जा रहे हरित कर (ग्रीन टैक्स) और उस पर लगाए गए जुर्माने की राशि को अन्यायपूर्ण बताते हुए कई नागरिकों ने इसका विरोध किया है। इस मुद्दे को लेकर प्रगतिशील नागरी समस्या निवारण समिति की ओर से आज नागपुर के संविधान चौक पर जोरदार प्रदर्शन किया गया।
प्रदर्शनकारियों की मुख्य माँग थी कि पुराने वाहनों पर लगाए जाने वाले हरित कर और जुर्माना कम किया जाए, साथ ही नई सुरक्षा नंबर प्लेट लगाने के लिए हरित कर जमा करने की शर्त को समाप्त किया जाए।
नागपुर में आज भी बड़ी संख्या में ऐसे लोग हैं, खासकर गरीब और श्रमिक वर्ग, जो पुराने वाहनों पर ही अपनी आजीविका निर्भर करते हैं। बेहद कम कीमत में खरीदे गए ये वाहन उन्हें कार्यस्थल तक पहुँचने में मदद करते हैं। लेकिन वर्तमान में हरित कर और उस पर लगाया गया दंड, वाहन की कीमत से भी अधिक हो जाता है। इससे आर्थिक रूप से कमजोर नागरिकों पर भारी बोझ पड़ रहा है। इसी कारण आज यह विरोध प्रदर्शन आयोजित किया गया।
इस प्रदर्शन में गुरुप्रीत सिंह, विट्ठल जुंघरे, एडवोकेट विजय फुलकर, अविनाश बडे, महेन्द्र उके, बुधाजी सुरकर, चंद्रहास सुटे, अनिल ढोकपांडे, अनंता सुके, वैभव जोगळेकर, कृणाल सावंत, मीना पाटील, मयूर तिरपुडे और नितिन ढोबळे समेत अनेक कार्यकर्ताओं ने भाग लिया।

राज्य शासनाच्या बहुजन विरोधी धोरणा विरोधात धरणे आंदोलन संपन्न.

0
नागपूर 28 : वंचित-शोषित-पीडित समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक न्याय हक्कासाठी आणि राज्य शासनाच्या बहुजन विरोधी धोरणविरोधात तसेच जनसुरक्षा कायदा 2024 या काळ्या कायद्या विरोधात संविधान चौक येथे रिपब्लिकन सोल्याडिरिटी मूव्हमेन्ट, राष्ट्रीय एकता आंदोलन अंतर्गत  रिपब्लिकन लोकशाही आघाडी द्वारा एक दिवसीय धरणे आंदोलन अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राईब महासंघ  यांचे नेतृत्वात आणि काम्रेड राजेंद्र साठे,शेखर सावरबांधे राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे प्रा रमेश पिशे, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडेरेशनचे प्रा. मधुकर उईके, भारतीय मुस्लिम परिषदचे प्रा. जावेद पाशा, संविधान परिवारचे प्रा राहुल मुन,प्रसिद्ध आंबेडकरी प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाळे, रिपब्लिन नेते अमृत गजभिये, प्रा एन व्ही ढोके, भारतीय बौद्ध महासभेचे इंजि पद्माकर गणवीर भीमराव फुसे,विजय मेश्राम, भीम आर्मीचे संजय फुलझेले, दिनेश गोडघाटे, एम एस जांभुळे, सुनंदा गायकवाड, भोला सरवर, श्यामराव हाडके, रवी पोथारे, रणजित रामटेके, संजय अंभोरे, राजेश ढेंगरे, अरविंद पाटील, प्रीती मेश्राम व आशा वर्कर्स सह विविध संघटनाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थिती होते. मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.
 मागण्या 
1)महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा 2024 असंविधानिक असल्याने रद्द करावा
2) अनुसूचित जातींचे उप वर्गीकरण जाती जातीत भेदभाव निर्माण करणारे असल्याने रद्द करावे.
3)शिक्षणाचे  खासगीकरण बंद करून सर्वाना मोफत व एक समान शिक्षणलागू करावे
4)आशा वर्कस व गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन रु 26000/- वेतन देण्यात यावे.
 5)शासकीय पडीत जमिनी अनुसूचित जाती व जमातीच्या भूमिहीनाना देण्यात याव्या.
6)पाली-बौद्ध विद्यापीठ स्थापन करणे आणि त्याकरिता 100एकर जागा व रु 200करोड मंजूर करावे.
7)छोटा बिंदू नामावली 2017प्रमाणे करण्यात यावी
8)सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळे पर्यंत 10000/-माह बेकारी भत्ता देण्यात यावा.
9) नागपूर येथे 130एकर जागेवर आंतर राष्ट्रीय नॅशनल पार्क मंजूर करावे
10) शासन सेवेतील मागासवर्गी्यांचा रिक्त पदांचा अनुशेष भरण्यासाठी विशेष भरती मोहीम सुरु करावी.
11) अनु जाती जमातीच्या कल्याणकारी योजनाचा हजारो कोटी चा वळविलेला निधी परत संबंधित विभागाकडे परत करावा.
12)कंत्राटी कर्मचारी भरती बंद करावी व 10वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे
या व इतर मागण्यासाठी आयोजित धरणे आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थिती होती
CITU, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडेरेशन, संविधान परिवार, भारतीय मुस्लिम परिषद, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा काष्ट्राईब महासंघ व इतर सामाजिक संघटना यांनी सहकार्य केले.

वैद्यकीय क्षेत्रातील नव्या संशोधनांचे रुग्णसेवेत मोठे योगदान.

0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; नॅशनल पीडियाट्रिक एपिलेप्सी कॉनक्लेव उद्घाटन

नागपूर 28 – कुठल्याही क्षेत्रात एकात्मिक विकास अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी त्या क्षेत्रात नवनवे संशोधन खूप आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रात देखील नव्या संशोधनांनी रुग्णसेवेत मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार, दि. २७ जून २०२५) केले.

महाराष्ट्र अकेडेमी ऑफ पीडियाट्रिक न्यूरॉलॉजी व इंडियन एपिलेप्सी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॅशनल पीडियाट्रिक एपिलेप्सी कॉनक्लेवचे उद्घाटन  गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला डॉ. प्रमोद गिरी, डॉ. लोकेंद्र सिंग, डॉ. अमरजित वाघ, डॉ. वानखेडे, डॉ. विनयन, डॉ. विलास जाधव आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

 गडकरी म्हणाले, ‘नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी आहे आणि नागपुरात पीडियाट्रिक न्यूरॉलॉजी या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर कॉन्कक्लेव होत आहे, याचा मनापासून आनंद आहे. अद्ययावत तंत्रज्ञान-विज्ञानाचा वापर वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचा ठरत आहे. वैद्यकीय विज्ञानात होत असलेले नवनवे संशोधन आणि डॉक्टरांचा अनुभव यांचे अनेक असाध्य आजारांवरील उपचारात मोठे योगदान ठरत आहे.’ नागपूरसारख्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर कॉन्फरन्स आयोजित करणे कौतुकास्पद आहे. कारण नागपूर आता हेल्थ हबच्या दिशेने वाटचाल करीत आहे. देशाच्या हृदयस्थानी असल्यामुळे शेजारच्या राज्यांमधील रुग्ण देखील याठिकाणी उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येतात, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

 

भविष्याचा वेध घेऊन केलेले संशोधन कुठल्याही क्षेत्रात महत्त्वाचे ठरते. वैद्यकीय क्षेत्रातही याचीच गरज आहे आणि त्यादृष्टीनेच देशात काम सुरू आहे, असे सांगतानाच अमेरिका आणि युरोपमध्ये भारतीय डॉक्टरांनी खूप नाव कमावल्याचा अभिमान असल्याचेही  गडकरी म्हणाले.

महा मेट्रो नागपूर व एनएचएआयमध्ये दोन राष्ट्रीय महामार्गांवर व्हायाडक्ट बांधकामासाठी सामंजस्य करार.

0

नागपूर 28 : नागपूर शहरातील शहरी वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणा दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि महा मेट्रो नागपूर यांच्यात औपचारिक सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (NH) – ४४ आणि (NH) -५३ वर मेट्रो व्हायाडक्टचे बांधकाम करण्यात येणार आहे

हा करार नागपूरमधील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) प्रादेशिक कार्यालयात राकेश प्रकाश सिंग (मुख्य महाव्यवस्थापक व प्रादेशिक अधिकारी, NHAI),  नरेश गुरबानी (कार्यकारी संचालक, महा मेट्रो) आणि  आर. अरुण कुमार (कार्यकारी संचालक, महा मेट्रो) यांच्या उपस्थितीत स्वाक्षरीत करण्यात आला. या करारामुळे महा मेट्रोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ आणि ५३ वर जामठा  ते बुटीबोरी (NH-44) आणि एच.बी. टाउन ते ट्रान्सपोर्ट नगर (NH-53) — या दोन महत्त्वाच्या मार्गांवर NHAIच्या ‘राईट ऑफ वे’ (RoW)चा वापर करून उन्नत मेट्रो मार्गिका उभारण्याची परवानगी मिळणार आहे.

सामायिक पायाभूत सुविधा,सामायिक दृष्टिकोन

या सामंजस्य कराराअंतर्गत उड्डाणपूल आणि मेट्रो व्हायाडक्टसाठी एकत्रित पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये एकत्रित संरचना उभारण्यावर भर देण्यात येत आहे. विशेषतः जामठा आणि डोंगरगाव येथे प्रस्तावित असलेल्या दोन सहा लेनच्या उड्डाणपूलांसाठी मेट्रो व्हायाडक्टसोबत एकाच संरचनेचा उपयोग केला जाणार आहे. ही रचना वाहनांच्या अंडरपाससाठीही उपयुक्त ठरणार असून, यामुळे जागेचा तसेच निधीचा अधिक कार्यक्षम आणि परिणामकारक वापर करता येणार आहे.

अभियांत्रिकी अचूकतेसाठी आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी कटिबद्धता

या करारात दोन्ही यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधण्याचा स्पष्ट आराखडा असून, सर्व डिझाईन्स भारतीय रस्ते काँग्रेस (IRC) च्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे सहा लेनच्या रस्ते विस्तारीकरणामध्ये आवश्यक सुरक्षा आणि किमान ६ मीटर उंचीची स्पष्टता सुनिश्चित केली जाईल. वाहिन्यांचे स्थलांतर, वाहतूक वळवणे आणि रस्त्याचे पुनर्बांधणी यासाठी दोन्ही संस्था समन्वयाने कार्य करतील.

कामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता आणि सुरक्षितता याची खातरजमा करण्यासाठी दोन्ही विभागांचे स्वतंत्र अधिकारी संयुक्तपणे स्थळ पाहणी करतील.

पुढील वाटचाल

या सामंजस्य कराराचे वर्णन एका रणनीतिक सहकार्याच्या रूपात करता येईल, जे नागपूरच्या वेगाने विस्तारत असलेल्या पायाभूत विकासाला चालना देणार आहे. राष्ट्रीय महामार्गांचा विकास आणि सार्वजनिक वाहतुकीची व्यापक व्यवस्था या दोहोंना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. नागपूरकरांसाठी हा करार भविष्यातील जलद, कार्यक्षम आणि सुरक्षित प्रवासाची दिशा निश्चित करणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

कुंभारे कॉलोनीत सिकलसेल तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

0

 

संदीप कांबळे, प्रतिनिधी 

91 नागरीकानी केली तपासणी

कामठी 28:-जागतिक सिकलसेल दिना निमित्त बोधिवृक्ष वाचनालय कुंभारे कॉलोनी कामठी येथे माजी नगरसेवक प्रतीक पडोळे यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय कामठी तर्फे सिकलसेल्स तपासणी शिबीर घेण्यात आले. या तपासणी शिबिरालप नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दरम्यान 91 नागरीकानी तपासनी करून घेतली.

या सिकलसेल तपासणी शिबिरात  डॉ. निता कांबळे, नर्स मनिषा पार्डीकर, प्रतिभा वंजारी तसेच आशा वर्कर रोशनी पान्तवणे यांनी विशेष आरोग्य सेवा पुरविली. तसेच ,या शिबिराच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक   प्रतीक पडोळे ,समाजसेवक गौतम माटे . आणि बोधिवृक्ष वाचनालयातील समस्त तरुण मंडळीने  विशेष सहकार्य दिले

गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही देणार भर – आदिवासी विकास मंत्री अशोक उईके.

0

कवडस येथील निवासी आश्रमशाळेत आदिवासी विकास मंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे केले स्वागत

नागपूर, 28 : ज्या विश्वासाने पालक शासकीय आश्रमशाळेत मुलांना दाखल करतात त्या विश्वासाला सार्थकी लावण्याची जबाबदारी ही शिक्षक व शाळेवर असते. पालकांच्या मनात आपल्या मुलांप्रती असलेल्या उज्वल भविष्याला साकार करण्यासाठी आश्रम शाळेतील शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी कठोर मेहनत घेतली पाहिजे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केले.

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात कवडस येथे आश्रमशाळेत आयोजित करण्यात आलेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात पालकांशी साधलेल्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच उषा रविंद्र सावळे, आदिवासी विकासाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, उपायुक्त दिंगबर चव्हाण, आदिवासी एकात्मिक प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर व मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत व शासन अनुदानित ज्या काही शाळा, शिक्षण संस्था आहेत त्यात शिकणाऱ्या आदिवासी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाहीत. शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांमुळे आपण आहोत हे शिक्षकांनी लक्षात घेतले पाहिजे. मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तसमवेत त्यांच्या आहारातील गुणवत्ता ही चांगलीच असली पाहिजे. याबाबत मुख्याध्यापक, संस्थाप्रमुख हे योग्य ती खबरदारी घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 शिक्षण क्षेत्रातील बदलांना व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीबाबत प्रक्रियेचा मी स्वत: एक भाग राहिलो आहे. विद्यार्थ्यांप्रती प्रत्येक शिक्षकांच्या मनात जी कणव असते ती अधिक समर्थपणे जपणे आवश्यक आहे. शिक्षकांनी पालकांशीही मनमोकळा संवाद साधला पाहिजे. या विश्वासार्हतेतून विद्यार्थ्यांना बळ मिळते. मुलांच्या अंगातील सुप्त गुण हे गुरुजणांनी लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही शाळेच्या केंद्रबिंदू ही मुलेच आहेत असे त्यांनी स्पष्ट केले

आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी 1751 प्रलंबित जागा येत्या शैक्षणिक सत्रापर्यंत भरती केल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.

आदिवासी विभागासाठी कुठल्याही प्रकारची निधीची कमतरता नसून 17 विभागाद्वारे आदिवासी विभागाच्या योजना या प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आदिवासी विभागाने संकल्प केल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातील कोणताही आदिवासी व्यक्ती शासकीय योजनांपासून वंचित राहू नये यासाठी “प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान” हाती घेतले आहे. हे अभियान अधिक सक्षमपणे संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबविले जात असल्याचे ते म्हणाले.

 आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते शाळेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

दिवासी बांधवांच्या विकासासाठी उपलब्ध निधीचे प्राधान्यक्रम ठरवा  – आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक ऊईके.

0

जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा घेतला आढावा

नागपूर, 28 : आदिवासी विकास विभागाकडून विविध विभागांना आदिवासींच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, संबंधित विभागाने हा निधी खर्च करताना त्याचा प्राधान्यक्रम व अधिकाधिक व्यक्तीविकास ठरविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी आज केले.

सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, आदिवासी विकास विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत विविध योजनांचा  आढावा डॉ. उईके यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार संजय मेश्राम,  नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर आयुक्त (महसूल) राजेश खवले, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, प्रकल्प अधिकारी नितीन इसोकार, माजी महापौर माया इनवाते आदी यावेळी उपस्थित होते.

आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी समाजाच्या विकासासाठी १६ विभागांना निधी उपलब्ध करून दिला जातो. यात सर्वाधिक ४२ टक्के निधी हा जिल्हा परिषदेला उपलब्ध करून दिला जातो.जिल्हा परिषदेमार्फत होत असलेल्या कामांबाबत सुलभता व गुणवत्ता जपण्यासाठी जिल्हा परिषदेत सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांची नियुक्ती येत्या काळात करण्याचे सूतोवाच आदिवासी विकास मंत्री उईके यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात एकूण ५८ गावे ही प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियान अंतर्गत केंद्र शासनाने निवडली आहेत. यात भिवापूर तालुक्यातील ४, हिंगणा तालुक्यातील ५, कामठी १, काटोल २, मौदा १, नागपूर १, नरखेड १, पारशिवनी २, रामटेक ३४, सावनेर ६ आणि उमरेड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या गावांमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

नागपूर महानगरपालिकेतील आदिवासी विभागाच्या विविध व योजना व उपक्रमांचा आढावा ऊईके यांनी यावेळी घेतला. एकात्मिक आदिवासी प्रकल्पांतर्गत शहरी भागातील (महानगरपालिका) अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. महानगरपालिकेसाठी २ हजार लाभार्थ्यांचे मंजूर उद्दिष्ट असून येत्या आठवडाभरात हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि उत्कर्षासाठी शासन विविध योजना राबवित आहे. शासकीय वसतिगृह, आश्रम शाळांमध्ये सर्व आवश्यक  सोयी-सुविधा अधिक भक्कमपणे निर्माण करण्यात येईल. आदिवासींच्या समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

तालुक्यातील १२१ दिव्यांग, वयोवृद्धांना साहित्य वाटप.

0
सचिन चौरसिया, प्रतिनिधी
रामटेक 28  :- एडीप’ व ‘वयोश्री’ या भारत सरकारच्या योजनांतर्गत दिव्यांग व वयोवृद्धांना मोफत साहित्य वाटपाकरिता तपासणी शिबिरात पात्र ठरलेल्या दिव्यांग व वयोवृद्धांना स्नेहसदन दिव्यांग मुलांची शाळा शितलवाडी येथे दि.२७ जुनला एकूण १२१ दिव्यांग व वयोवृद्ध लाभार्थीनां राज्यमंत्री अँड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी राज्य शासन लवकरच जिल्हा नियोजन विकास समितीचा दिव्यांगांकरिता राखीव केलेला १ टक्के निधी वितरणाची कार्यपध्दती दिव्यांग कल्याण विभागामार्फत जाहीर करणार असून दिव्यांगांना त्यातून आपले जीवनमान उचंविण्यासाठी मोलाची मदत मिळेल. तसेच माझा दिव्यांग सहाय्यता कक्षामार्फत लवकरच एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजे दिव्यांग करिता आवश्यक साधन साहित्य लवकर प्राप्त होण्यासाठी दिव्यांग साहित्य बँक चे उपक्रम राबविण्यात येणार असे सांगितले. कार्यक्रमाला शीतलवाडी चे माजी सरपंच धर्मराज रहाटे सदस्य संजय येनूरकर, विकास झाडें,संकेत काठीकार, डॉ. आकाश यादव ( क्लिनिकल प्रोस्थेटिस्ट एंड ऑर्थोटिस्ट) रुद्र धनराज चोपड़े (ईडीपी) निखिल कसारे ( यूएसडब्लू) स्नेहसदन शाळेचे मुख्याध्यापक पंकज पांडे, व शाळेतील विशेष शिक्षक प्रदीप बागडे, प्रीतम मानकर, सविता अतकर, प्रिया दुबे, किश्वर शेख, प्रविण महल्ले, प्रवीण, अशोक पातोडे कर्मचारी सचिन झाडें, अमन दीक्षित, मोहन बांगडे, नितीन खेवले, अतुल घोडाकाडे, विशाल भाजीपाले, सुनीता मसराम, मनीषा नरुले, मिनाक्षी वाघधरे, अश्विनी गोरे, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपुर व सीआरसी नागपूर यांचे विशेष सहकार्य लाभले.

‘कालिदास दिन’ विदर्भसाहित्य संघाचे कविसंमेलन.

0
सचिन चौरसिया, प्रतिनिधी
रामटेक 28 : संस्कृत भाषा व संस्कृत साहित्य यांची व्याप्ती मोठी आहे. कुठे ‘यक्षाचं विरहगीत’, तर कुठे संस्कृत वाङ्मयाविषयी मार्गदर्शन, अशा पद्धतीने आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच कालिदास दिन शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. रामटेक रसिकांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विदर्भ साहित्य संघ, सृष्टी सौंदर्य बहुउद्देशीय संस्था आणि कँप्म चेरी फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. सकाळी गांधी चौक ते कालिदास स्मारक हेरिटेज वॉक चे आयोजन करण्यात आले असून दुपारी ४ वाजता कालिदास स्मारक येथे आषाढ कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी दीपक गिरधर तर कविसंमेलनात प्रा. डॉ. गिरीष सपाटे, रामचंद्र जोशी, माऊली इंगळकर, रमा गजभिये, इरपाचे, डॉ. सावन धर्मपूरीवार, संतोष ठकरेले, अरुण जाधव, डॉ गजेंद्र बरबटे, डॉ. आश्विनी बरबटे, नेतराम इंगळकर, माला रोकडे, मिनाज पैचातोड, जयश्री पांगारकर, ऋषिकेष किंमतकर, शुभाष चव्हान,अनिल दाणी, संजिवनी पाटील, आश्विनी मदनकर सचिन पाटील, राहुल सोमकुंवर, राकेश खलासणे सहित २२ कवि सहभागी झाले होते. कविनि कालिदास धरती माता, पाऊस शहित आदिवर कविता सादर केल्या. डॉ. सावन धर्मपुरीवार यांनी प्रास्ताविक तर संचालन  सचिन चव्हाण व जगदीश गुजरकर यांनी केले. आभार रविंद्र पाणतावने यांनी मानले.
जनप्रतिनिधि जबाबदार
ते म्हणाले की संस्कृत क्षेत्रातील प्रतिभावंत साहित्यिक व महाकवी कालिदास यांनी स्वत:च्या प्रतिभेच्या जोरावर वाचकांच्या मनावर मोहिनी घातली. कविकुलगुरू कालिदास साहित्यक्षेत्राचे मेरूमणी आहेत. कालिदास जगातील सर्वश्रेष्ठ कवि होते. त्यांचे जगविख्यात समारक रामटेक ला आहे. परंतु येथे विजपूरवठा नाही. सेकुरीटी व्यवस्था व स्वछता नाही. या दुराव्यवस्थे करिता त्यानी प्रशासन व जनप्रतिनिधि यानां जबाबदार ठरविले.
इसवी सणाच्या चौथ्या शतकात महाकवि कालिदास होवून गेले. महाकवि कालिदास हे उज्जैनच्या गुप्त दरबारातील नवरत्नांपैकी एक होते. गुप्त राजकुमारी प्रभावती गुप्त हिचा विवाह वाकाटक राजकुमार रुद्रसेन व्दितीय यांच्या सोबत झाला. रुद्रसेन अल्पायुषी ठरल्याने राज्यकारभाराची जबाबदारी प्रभावतीवर येवून पडली, तिला राज्यकारभाराचा अनुभव नसल्याने उज्जैनीवरुन काही अनुभवी लोकांना वाकाटक दरबारी राणी प्रभावतीच्या मदतीसाठी पाठविण्यात आले त्यातले कालिदास एक होते. नंदीवर्धन म्हणजेच आजचे नगरधन ही वाकाटकांची राजधानी होती. वाकाटकांच्या राज्याचा विस्तार विदर्भ ते डेक्कन असा होता.

राजेशाही म्हणजे हुकूमशाही अशी मन आहे याला शाहू राजे अपवाद होते – सुधाकरराव टवळे.

0
नागपूर 28 :  राजेशाहीचा गर्दित लोकशाहिला थारा नव्हतीच परंतु या देशाचा पटलावर माणूसकीचा पाझरा फोडून समता मुलक समाजाची शिकवण देवून परिवर्तनाची वाट सरळ करून राजा कशा असावा हि छाप सोडून गेलेले प्रखर लोकशाही चे पुरस्कर्ते राजे छत्रपती शाहू महाराज हे होते असे प्रतिपादन बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे विचार मंच चे अध्यक्ष सुधाकराव टवळे यांनी केले ते आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने आयोजित छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चळवळीचे खंदे कार्यकर्ते राजु कांबळे हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून नामदेवराव निकोसे, जयदेव चिंवडे, सुप्रसिद्ध कवी तन्हा नागपुरी राजु दादा पांजरे हे होते नामदेवराव निकोसे यांनी महाराजांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकताना कथन केले शाहू महाराजांचे पाणी जिरवा पाणी अडवा हे धोरण ऐतिहासिक ठेवा आहे राधाबाई धरण बांधताना त्यांच्या रजयेत वेठबिगारी ची कांमे करणारे महार,चमार भंगी ढोर यांना धरणाचे बांधकाम करण्यासाठी प्राधान्य देवून त्यांच्या वर जे उपकार केले ते विसरतात येत नाही असे भाष्य केले. सुखदेव राव मेश्राम यांनी छायाचित्रावर पुष्पहार अर्पण केले तर आंरिमो चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी दिपप्रज्वलन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष प्रा.रमेश दुपारे यांनी केले कार्यक्रमात पुण्यशील बोदिले यांची शहर महासचिव पदावर नियुक्ती झाली म्हणून त्यांचा राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी आनंदराव गोरे, मनोहर इंगोले, शालिक बांगर, अभिषेक मिश्रा, राहूल त्रिवेदी,व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.