Home Latest News पॅनकार्ड क्लब गुंतवणूकदार ठेवीबाबतचा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला आढावा

पॅनकार्ड क्लब गुंतवणूकदार ठेवीबाबतचा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला आढावा

0

<p><strong>मुंबई &colon;<&sol;strong>&&num;8211&semi; पॅनकार्ड क्लब लि&period; मध्ये गुंतवणूकदारांनी पैशांची गुंतवणूक केली आहे&period; या गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळावा या संबंधी सुरू असलेल्या प्रक्रियेचा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी यापूर्वी ११ जून २०२५ रोजी आढावा घेतला होता&period; त्यानुषंगाने गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज मंत्रालय येथे पुन्हा आढावा बैठक घेतली&period;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्र ठेवीदारांच्या &lpar; वित्तीय संस्थामधील&rpar; हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ अन्वये पॅनकार्ड क्लब लि&period; या वित्तीय संस्थेने केलेल्या सुमारे ७ हजार कोटी रुपयांच्या फसवणूक संदर्भात गृह राज्यमंत्री &lpar;शहरे&rpar; योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली&period;<&sol;p>&NewLine;<p>पॅनकार्ड क्लब लि&period; बाधित गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळाला पाहिजे&comma; यासाठी या प्रकरणी ज्या मालमत्ता संरक्षित केल्या आहेत त्या संदर्भात न्यायालयाचा निर्णय येत नाही तो पर्यंत कोणताही बेकायदेशीर व्यवहार होऊ नये याची संबधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी&period; तसेच किती मालमत्ता संरक्षित आहेत&comma; किती मालमत्ता अद्यापि संरक्षित केलेल्या नाहीत याची माहिती संकलित करावी&period; सक्षम प्राधिकारी यांच्याकडील प्रलंबित कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या अनुषंगाने संबंधित सर्व जिल्हाधिकारी यांची देखील बैठक घेण्यात येईल असे राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यमंत्री कदम म्हणाले&comma; पॅनकार्ड क्लब लि&period; बाधित गुंतवणूकदारांचा पैसा त्यांना मिळावा यासाठी सर्वसंबंधित यंत्रणानी समन्वयाने सर्व कायदेशीर प्रकिया तातडीने करावी आणि गुंतवणूकदारांचे पैसे लवकर परत देण्याची कार्यवाही करावी&period;<&sol;p>&NewLine;<p>या बैठकीस प्रधान सचिव &lpar;गृह&rpar; अनुपकुमार सिंह&comma; पोलिस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा&comma; पोलिस अधीक्षक दीपक देवराज&comma; उपसचिव यमुना जाधव यांच्यासह सेबीचे वरिष्ठ अधिकारी&comma; तपास अधिकारी&comma; सक्षम प्राधिकारी आणि गुंतवणूकदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version