spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे मांढळ, कुही येथे आयोजन

नागपूर :- जिल्हयातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर व लेमदेव पाटील महाविद्यालय, मांढळ, ता.कुही, जि. नागपूर यांचे संयुक्त विदयमाने गुरुवार, 18 सप्टेंबर रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन श्री. लेमदेव पाटील महाविद्यालय, मांढळ,ता.कुही येथे करण्यात आलेले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये Vaibhav Enterprises Nagpur, SBI C-Manish Nagar, Provinicial Lifestyle, Sahyog Multistate Credit Cooperative Society, Tata Consultancy Services (Mihan Nagpur), Muthoot Microfinance, Quescorp L.TD, Effimen Services..इत्यादी कंपन्या मार्फत ५००+ पेक्षा जास्त जागांसाठी दहावी, बारावी. पदवी, पदव्युत्तर, आटीआय, डिप्लोमा इत्यादी पात्रताधारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची प्राथमिक निवड केली जाणार आहे. यासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हयातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

जास्तीत जास्त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.