spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राम रक्षा आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा – खासदार संजय राऊत

कामठी :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी कामठी येथील जयस्तंभ चौकात आयोजित सभेत नागरिकांना १८ जुलैपासून नागपुरात सुरू होणाऱ्या ‘राम रक्षा आंदोलनात’ मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

सभेला संबोधित करताना राऊत यांनी अयोध्या येथील राम मंदिरातील कथित दागिने चोरीच्या प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या मंदिरात अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणातील खऱ्या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

कार्यक्रमात रामटेकचे माजी खासदार प्रकाश जाधव, विशाल बरघटे, स्थानिक कामठी शिवसेना पदाधिकारी, ट्रक असोसिएशनचे प्रतिनिधी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नागपुरात होणाऱ्या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही सहभागी होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.

Popular Articles