Home Latest News जनहित प्रश्नांवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा हल्ला-बोल मोर्चा

जनहित प्रश्नांवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा हल्ला-बोल मोर्चा

0

<p><strong>संविधान चौकातून आंदोलकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर ११ &colon;<&sol;strong> जनतेचे हक्क हिरावले जाणार नाहीत&comma; अन्याय सहन केला जाणार नाही या निर्धाराने बुधवारी नागपूरच्या संविधान चौकातून पीपल्स रिपब्लिकन पार्टी&comma; राष्ट्रीय मजदूर सेना आणि दलित मुक्ती सेनेच्या बॅनरखाली भव्य हल्लाबोल आंदोलन उभारण्यात आले&period; शासनाकडून वारंवार होत असलेल्या जनहिताच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा तीव्र निषेध करत या आंदोलनातून जनतेच्या मूलभूत मागण्या सरकारपुढे जोरकसपणे मांडण्यात आल्या&period; या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष मा&period; कैलाश बांबोले यांनी केले तर विशेष उपस्थिती जिल्हाध्यक्ष  विजय पाटील यांची होती&period; आंदोलनाला लाँग मार्चचे प्रणेते व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा&period; जोगेंद्र कवाडे सर आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष &lpar;राज्यमंत्री दर्जा&rpar; व राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा&period; जयदीपभाई कवाडे यांचे थेट मार्गदर्शन लाभले&period;<br &sol;>&NewLine;संविधान चौकातून सुरू झालेला मोर्चा घोषणाबाजीच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला&period; यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले&period; आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये स्मार्ट मीटर जबरदस्ती लावणे थांबवणे&comma; पटवर्धन मैदान येथील डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारकाचे काम सुरू करणे&comma; दीक्षाभूमी परिसराचे सौंदर्यीकरण तातडीने पूर्ण करणे&comma; नागपूर शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविणे&comma; लष्करी बाग व लक्ष्मीनगर झोनमधील रहिवाशांना मालकी पट्टे देणे&comma; इंदौरा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वसतिगृह व वर्कशॉपची सुविधा निर्माण करणे&comma; नागपूर मेट्रोमुळे निर्माण झालेल्या जीवघेण्या गुह्यांची दुरुस्ती करणे&comma; मनपा व जिल्हा परिषदेतील शाळा बंद न करणे&comma; महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा रद्द करणे&comma; कोराडी प्रकल्पातील कंत्राटी कामगारांना कामावर घेणे&comma; आरोग्य विभाग व मनपातील कंत्राटी कामगारांना स्थायी करणे&comma; ठेकेदारी पद्धती रद्द करणे&comma; नागपूर बससेवेतील चालकांवरील गुन्हे मागे घेणे&comma; ताजबाग रहिवाशांना मालकी पट्टे देणे&comma; उमरेड–कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पातील 99 प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरी देणे तसेच शासकीय दूध व्यवसाय विकास योजना येथील 17 स्थायी कामगारांचे थकीत वेतन व एरिअर्स तत्काळ देणे अशा मागण्या करण्यात आल्या&period; या आंदोलनात नागपूर जिल्हा अध्यक्ष नरेंद्र डोंगरे&comma; विदर्भ प्रदेश संघटक अंकित धुपे&comma; नागपूर जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष पलाश ठवरे&comma; शहर महिला आघाडी अध्यक्षा प्रतिभा मानवटकर&comma; शहर युवा आघाडी अध्यक्ष सोहेल खान&comma; पूर्व विदर्भ सचिव डेनी सोमंकुवर&comma; महिला आघाडी अध्यक्षा सूचिता कोटांगले&comma; ग्रामीण महिला आघाडी अध्यक्ष सुनीता शेंडे&comma; उत्तर नागपूर अध्यक्ष कुंदन उके&comma; तसेच अजय चव्हाण&comma; दिलीप पाटील&comma; सोपान मानवटकर&comma; शितल बोरकर&comma; संजय खांडेकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी&comma; महिला व युवक कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले&period; संविधान&comma; लोकशाही व सामाजिक न्यायाचे रक्षण करण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी सदैव अग्रभागी राहील&period; जनतेच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत&comma; तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल&comma; असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे देण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version