spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान मध्ये भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारून सौंदर्यीकरण करून द्या

– नगराध्यक्ष व मुख्याधिकारी आणि सभापती यांना बिरसा ब्रिगेड ची मागणी

कन्हान :- नगरपरिषद कन्हान-पिपरी मालकीच्या जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ किंवा नगरपरिषदे च्या परिसरात आदिवासी समाजाचे महान स्वातंत्र्य सैनिक व जननायक, भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारून सुशोभीकरण करून देण्याची मागणी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी आणि सभापती हयाना बिरसा ब्रिगेड व समाज बांधवा व्दारे निवेदन देऊन करण्यात आली.

कन्हान शहरातील नागरिकाना भगवान बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचा व आदिवासी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक योगदानाचा सन्मान करण्यास आणि त्यांच्या कार्याची माहिती भावी पिढी पर्यंत पोहोचावी तसेच त्यांच्या स्मृतीचा सन्मान व्हावा यास्तव नगरपरिषद कन्हान पिपरी च्या मालकीच्या योग्य स्थळी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ किंवा नगरपरिषदे च्या परिसरात आदिवासी समाजाचे महान स्वातंत्र्य सैनिक व जननायक, भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारून माहीती फलक व परिसराचे आवश्यक सुशोभीकरण करून देण्याकरिता सार्थ उद्देशाने नगरपरिषद प्रशासनाने सकारात्मक विचार करून आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही करावी आणि शासनाच्या लागु नियमांनुसार योग्य निधीतुन सदर कामास मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव संबंधित सक्षम प्राधिकरणास पाठवावा. असे निवदेन नगरपरिषद कन्हान-पिपरी नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे आणि मुख्याधिकारी दिपक घोडकी तसेच महिला बाल कल्याण सभापती योगिता भलावी हयाना बिरसा ब्रिगेड व्दारे निवेदन देऊन मागणी करण्यात आली. याप्रसंगी बिरसा ब्रिगेड चे सुखलाल मडावी यांच्या प्रमुख उपस्थित बंडु इरपाते , रामलाल पटटा, गगन सिरसाम,रोशन मरस्कोल्हे, मानसिंग टेकाम, गणपत मरस्कोल्हे, सुरेश सिडाम, शालु सुर्यवंशी, सुनिता मेहता, केसर सिरसाम, गीता इरपाते, तसम इरपाते, सुशिला इरपाते, संगिता डोमळे ,सरोज मरस्कोल्हे, मानसी राऊत, गौरी नागवंशी, मीरा इनवाते सह आदीवासी समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

Popular Articles