spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पीएमश्री जि प शाळा दहेगाव येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा 

किशोर साहू, मौदा, ता. १६:- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन घेण्यात आला, तसेच हात धुणे हा उपक्रम, तसेच नवोदय अभिरुप परीक्षा बुधवार (दि. 15 ऑक्टोंबर) ला घेण्यात आली. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे, उपाध्यक्ष रणधीर आंबिलढुके हे होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी डॉ. एपीजे अब्दुल अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगून केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. मानवी हटवार ,स्वरा हटवार योगराज आकरे ,आयांश आंबिलढुके, मानवी घडोले, काव्या आंबीलढुके यांनी याप्रसंगी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली. शिक्षक सुधीर कांबळे यांनी हात धुवा उपक्रमात हात धुण्याच्या स्टेप विद्यार्थ्यांना कृतीयुक्त करून दाखविले.

शिक्षकवृंद सुधीर खंडाईत ,राजेश रोहाड, लीलाधर काळबांधे सुजाता बोधले ,संगीता कारेमोरे, प्रज्ञा रामटेके यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. उमेश उके पुष्पलता, कैलास कटिंग यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.