Home Latest News जय भीम चौकात ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या पोलिसांकडून ७ संशयित ताब्यात

जय भीम चौकात ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या पोलिसांकडून ७ संशयित ताब्यात

0

<p><strong>नागपूर १४ &colon; <&sol;strong> नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय भीम चौक परिसरात एका ३० वर्षीय तरुणाची डोक्यात जड वस्तूने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे&period; मृत व्यक्तीचे नाव राजेश धनविजय &lpar;वय ३०&comma; रा&period; हिरवी नगर&comma; जय भीम चौक&rpar; असे असून&comma; ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडल्याचा अंदाज आहे&period; प्राथमिक माहितीनुसार&comma; राजेशला दारूचे व्यसन होते आणि तो वारंवार आपल्या मित्रांसह जय भीम चौकातील भाऊराव अवसरे यांच्या घरी दारू पार्टीसाठी जात असे&period; मंगळवारी देखील तो अशाच एका पार्टीसाठी तिथे गेला होता&period; मात्र&comma; त्यानंतर त्याचा मृतदेह बुधवारी सकाळी घरात आढळून आला&period; त्याच्या डोक्यावर जड वस्तूने वार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे&period; ही घटना उघडकीस येण्यामागे परिसरातील एका हॉटेल मालकाची भूमिका महत्त्वाची ठरली&period; बुधवारी सकाळी परिसरात मृतदेहाबाबत चर्चा सुरू असताना संबंधित हॉटेल मालकाने नंदनवन पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली&period; त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला&period; राजेश हा खासगी कंपनीत करवतीच्या मशीनवर काम करत होता&period; तो फक्त जेवणासाठीच घरी येत असे&period; त्याच्या कुटुंबात आई आणि एक बहीण असून&comma; त्याचे वडील वारलेले आहेत&period; या प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखवत ६ ते ७ संशयितांना ताब्यात घेतले असून&comma; त्यांची चौकशी सुरू आहे&period; मात्र&comma; हत्येचे नेमके कारण आणि मारेकरी कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही&period; नंदनवन पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून&comma; लवकरच गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version