Home Latest News कुख्यात गुंड विशाल ढोकणेला एमपीडीए अंतर्गत अटक जिल्हा कारागृहात रवानगी

कुख्यात गुंड विशाल ढोकणेला एमपीडीए अंतर्गत अटक जिल्हा कारागृहात रवानगी

0

<p><strong>अकोला १४ &colon;<&sol;strong> येत्या उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अकोला पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे&period; खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कवडे नगर&comma; सिंधी कॅम्प&comma; खांड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड विशाल लक्ष्मण ढोकणे &lpar;वय २५&rpar; याला एमपीडीए कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे&period; त्याला १२ ऑगस्ट रोजी जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे&period; विशाल ढोकणे याच्यावर बेकायदेशीर जमावबंदी&comma; दंगल&comma; प्राणघातक शस्त्रे बाळगणे&comma; गंभीर दुखापत करणे&comma; धमकी देणे&comma; शांतता भंग करणे अशा अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे&period; यापूर्वी त्याच्याविरोधात विविध प्रतिबंधात्मक कारवाया देखील करण्यात आल्या होत्या&period; मात्र&comma; त्याने या कारवायांकडे दुर्लक्ष करत आपले गुन्हेगारी वर्तन सुरूच ठेवले होते&period;<br &sol;>&NewLine;त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांवर आळा घालण्यासाठी अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्याच्याविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे पाठवला होता&period; प्रस्तावाची बारकाईने कायदेशीर तपासणी केल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्याला अटक करण्याचे आदेश जारी केले&period; या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी काहीसा दिलासा व्यक्त केला आहे&period; पोलिस प्रशासनाने सांगितले की&comma; अशा प्रकारचे गुन्हेगारी वर्तन सहन केले जाणार नाही आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली जातील&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version