spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सरपंच लुंबिनी महेश कलारे यांच्या नेतृत्वात चाचेरमध्ये पोलिओ मोहिम यशस्वी, महिला पदाधिकारी व आरोग्य टीम मैदानात

किशोर साहू, मौदा :- रविवार (ता.28 जून) ला ग्रामपंचायत चाचेर येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम मोठ्या उत्साहात राबविण्यात आली. सरपंचा लुंबिनी महेश कलारे यांनी स्वतः लहान बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ केला.

या मोहिमेत ग्रामपंचायत सदस्या चंद्रकला धोटे, सुमन सोमकुवर,नलू दरवई, सविता जांभरे, रोशनी किरपान, ममता चौरे या सर्व महिला सदस्यांनी पोलिओ मोहिमेत सक्रिय सहभाग घेत घरोघरी जाऊन जनजागृती केली.

आरोग्य विभागाकडून डॉ. अर्चना दुर्गे, आरोग्य सेविका इंदु मनगटे, अंगणवाडी सेविका पुष्पा बिसने, सविता बावणे, इंदुताई बागडे यांनी अथक परिश्रम घेतले. आयुर्वेदिक दवाखाना चाचेर व माताबालसंगोपन उपकेंद्र यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

वार्ड क्र. 1 हनुमान मंदिर व गावात

ठीकठिकाणी बूथ लावून 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे 100% लसीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

याप्रसंगी सरपंचा लुंबिनी कलारे म्हणाल्या, “माझे गाव, माझी जबाबदारी. एकही मूल पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही. आमच्या सर्व महिला सदस्या व आरोग्य ताईंच्या सहकार्याने चाचेर पोलिओ मुक्त करू. सर्व पालकांनी सहकार्य करावे.”

Popular Articles