Related Posts

कोदेगावातील कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित, अज्ञात चोरांचा धुमाकूळ, विद्युत तारा चोरी

<p><strong>खापा&comma; वार्ताहर &colon;-<&sol;strong> कोदेगाव-खापा मार्गावरील गुरूजी पेट्रोल पंपामागील विद्युत तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने परिसरातील शेतातील विद्युत पंपांचा वीजपुरवठा गेल्या काही दिवसांपासून खंडित झाला आहे&period; त्यामुळे पिकांना पाणी देणे अशक्य झाले असून शेतकरी संकटात सापडले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>कोदेगाव शिवारातील तुमाने पेट्रोल पंपाजवळील रोहित्रावरून शेतात जाणाऱ्या मुख्य विद्युत तारा चोरट्यांनी कापून नेल्या&period; परिणामी मोटारपंप बंद पडले असून विहिरी आणि कूपनलिकांमधून पाणी उपसणे थांबले आहे&period; उभी पिके वाळू लागली असून जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे&period; वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या अभियंत्यांना निवेदन दिले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नवीन विद्युत तारा टाकून वीजपुरवठा सुरू करावा&comma; अशी मागणी दिवाकर बोंद्रे&comma; बापूराव खुताळकर&comma; रामकृष्णा रोकडे&comma; रमेश बोंद्रे&comma; दिनेश गिरी&comma; मधुकर सुरजुसे&comma; सुनील बोंद्रे आणि सुधाकर पडोळे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे&period; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे&period;<&sol;p>&NewLine;