spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आजपासून नागपूर, भंडारा, गोंदिया व बालाघाट जिल्ह्यात प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठानची धम्म प्रचार मोहीम सुरू

– माजी अतिरिक्त मुख्य सचिव श्याम तागडे(IAS) यांच्या नेतृत्वाखाली ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान धम्म जागर कार्यक्रम.

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षेवेळी व्यक्त केलेली अपेक्षा आणि धम्म प्रचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी, प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान द्वारा संचालित बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय धम्म अकादमी, नागपूरच्या वतीने ‘धम्म प्रचार मोहिमे’चे आयोजन करण्यात आले आहे. ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नागपूर, भंडारा, गोंदिया आणि बालाघाट या चार जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव तथा प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम तागडे (IAS सेवानिवृत्त) यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडणार आहे. उपासक-उपासिकांनी पंचशील, अष्टशील आणि अष्टांगिक मार्गाचे पालन करून सदाचारी समाजाची निर्मिती करावी, या उद्देशाने या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.

असा आहे मोहिमेचा कार्यक्रम:

७ फेब्रुवारी २०२६ (नागपूर व भंडारा जिल्हा):

सकाळी १०:०० वाजता मौदा (मैत्रेय बुद्ध विहार) येथून मोहिमेची सुरुवात होईल. त्यानंतर भंडारा जिल्ह्यात दुपारी ३:३० वाजता निमगाव (पहेला), ४:०० वाजता अडयाळ आणि सायंकाळी ६:०० वाजता पवनी (गौतम नगर) येथे धम्मप्रचार सभा होतील.

८ फेब्रुवारी २०२६ (भंडारा व बालाघाट जिल्हा):

सकाळी १०:०० वाजता मोहाडी, दुपारी १२:०० वाजता तुमसर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह), २:०० वाजता सीतासावंगी, २:३० वाजता सुंदरटोला आणि ३:०० वाजता नावरगाव येथे मार्गदर्शन होईल. सायंकाळी ६:०० वाजता बालाघाट (मध्य प्रदेश) येथील चुल्ही बुद्ध विहार येथे ही मोहीम पोहोचेल.

९ फेब्रुवारी २०२६ (गोंदिया जिल्हा):

सकाळी १०:०० वाजता गोंदिया (भीमनगर), दुपारी ३:०० वाजता गोरेगाव, ४:०० वाजता पिंडकेपार आणि सायंकाळी ५:०० वाजता सडक अर्जुनी येथे मोहिमेचा समारोप होईल.

पांढऱ्या गणवेशात उपस्थित राहण्याचे आवाहन

धम्म प्रचार मोहिमेमध्ये सहभागी होताना सर्व उपासक-उपासिकांनी स्वच्छ पांढरा गणवेश परिधान करून उपस्थित राहावे. तसेच बुद्ध धम्माचे आचरण करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. माया ब्राम्हणे, विनोद रामटेके, इंजि. अनिल बागडे आणि डॉ. कबीर रावळेकर यांनी केले आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी स्थानिक पातळीवर राकेश रामटेके, मुनीश्वर बोदलकर, माणिक रामटेके, बाळकृष्ण रामटेके यांसह अनेक पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Popular Articles