spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा जिल्ह्यात २६ नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

हंसराज, भंडारा :- भगवान बिरसा मुंडा जयंती, गुरुनानक जयंती तसेच दिवाळीनंतर जिल्ह्यात गावोगावी आयोजित करण्यात येणाऱ्या मंडई उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भंडारा जिल्ह्यात २६ नोव्हेंबर २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी मनोहर चव्हाण यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये हे आदेश जारी केले आहेत.

धानाला बोनस देणे, जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करणे, शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी देणे, स्वतंत्र ओबीसी कॉलम लागू करणे तसेच गोसे प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन आदी विविध मागण्यांसाठी जिल्ह्यात आंदोलने, मोर्चे व निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

आदेशानुसार शस्त्रे, दाहक व स्फोटक पदार्थ बाळगणे, चिथावणीखोर भाषणे करणे, आक्षेपार्ह घोषणाबाजी करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे.

मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांचे कर्तव्य बजावणे, प्रेतयात्रा, विवाह सोहळे, धार्मिक कार्यक्रम तसेच यात्रांच्या मिरवणुकांना नियमानुसार सूट देण्यात आली आहे.

नागरिकांनी मनाई आदेशाचे काटेकोर पालन करून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांनी केले आहे.

Popular Articles