– हलबांचा विश्वासघाताचे परिणाम दाखवू – आदिम नेत्या ॲड.नंदा पराते
गोळीबार चौकात राष्ट्रीय आदिम कृती समितीने भाजप सरकार विरोधात आंदोलन केले, त्यावेळेस शेकडो हलबा बांधवांची उपस्थिती होती. बीजेपीच्या सरकारने घटना यादीत असलेल्या हलबा जमातीसंबंधी कोष्टी हा व्यवसाय असल्याची अधिसूचना काढून न्याय द्यावा, ही मागणी घेऊन गोळीबार चौकात भाजप सरकार विरोधात आक्रोश दाखविण्यासाठी राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या बॅनर खाली नारे -निर्दर्शने आंदोलन झाले. यावेळी गर्व से कहो हम आदिवासी है, भारत के मूल निवासी है, जितनी जिनकी संख्या भारी ,उतनी उनकी भागीदारी, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, आदिवासी हलबांना न्याय मिळालाच पाहिजे, आदिवासी हलबांना जमातीचे वैधता प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे, महायुती सरकार हाय हाय…हाय हाय, कोष्टी धंद्याची घटना दुरुस्ती झालीच पाहिजे असे गगनभेदी नारे देण्यात आले.
महाराष्ट्रातील धनगर समाज सातत्याने लढतो आहे, त्याचे काय ? 114 निष्पाप लोकांचे बलिदान देवूनही गोवारी समाज आजही उपेक्षित आहे. घटना यादीतील “गोंड गोवारी”मध्ये कॉमा कधी पडणार? अनुसुचित हलबा जमातीच्या संविधानीक सवलतीचा प्रश्न असाच लोंबकळत ठेवुन भाजप नेत्यांनी फसगत केली आहे, हे हलबा विणकारांना प्रकर्षाने जानवत आहे. असा आरोप आदिम नेत्यांनी केला.
सन २०१३ ला बचत भवन सिताबर्डीच्या आदिम हलबांच्या अधिवेशनात “आमच सरकार आलं तर ६ महिन्यात हा प्रश्न कायमचा सोडवु” असं जाहीर आश्वासन त्यावेळचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. या जमातीने फडणवीस आणि नितीन गडकरी या भाजप नेत्यांवर विश्वास ठेवून २०१४,२०१९ व २०२४ च्या निवडणूकीत पाठींबा दिला.“डबल इंजिनच” सरकार सत्तेत आलं पण हलबांचा प्रश्न सुटला नाही म्हणजेच भाजप सत्तेत येवूनही हलबा जमातीचा विश्वासघात केला आहे, अशी भावना आहे. हलबांची थटटा करण्याचे भाजप नेत्यांनी ठरविलेले असेल तर त्यांची जागा दाखविण्याचा निर्णय हलबा जमातीने घेतला आहे, असे राष्ट्रीय आदिम कृती समितीचे विश्वनाथ आसई, आदिम नेत्या ॲड. नंदा पराते, दे. बा. नांदकर ,प्रकाश निमजे, धनराज पखाले, मनोहर घोराडकर, हरेश निमजे, ताराचंद बहारघरे, मोतीराम मोहाडीकर, हेमंत बरडे, दिपक देवघरे, पुरुषोत्तम सेलूकर, उमराव खरबीकर, ओमप्रकाश शाहीर, संजय धापोडकर,प्रविण भिसीकर,सचिन बोरीकर, जितेंद्र वेळेवर,रामा नंदनवार,विनायक वाघ,नरेश बोकडे,चंद्रशेखर पौनिकर यांनी दिला.
मुंबई उच्च न्यायालय,नागपूर खंडपिठाने शासनाच्या जाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या शेकडो निर्णया विरोधात कोष्टी हा व्यवसायवाचक शब्द असून हलबा,हलबी ही घटना यादीतील जमात आहे , याबाबत आदिमच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर केंद्र शासनाला तशी शिफारस पाठविण्याचे वारंवार आश्वासन दिलेत. हलबांचा विश्वासघात होतो आहे म्हणुन हलबा जमातीने गोळीबार चौकात नारे-निदर्शने आंदोलन केले.
या नारे-निदर्शने आंदोलनात वासुदेव वाकोडीकर, पुरुषोत्तम सेलूकर,श्रीकांत ढोलके,भास्कर चिचघरे, दशरथ गहाणे,शकुंतला वट्टीघरे,विजय नंदनवार, शिवशंकर रणदिवे,अश्विन अंजीकर,भास्कर केदारे, जितेंद्र मोहाडीकर, प्रदीप पौनिकर,प्रकाश दुलेवाले, शंकर बोरीकर, जगदीश खापेकर,संगिता सोनक, लक्ष्मी चिंचघरे, बबन हेडाऊ,स्वप्निल खापेकर,सुभाष भनारकर, आकाश पौनिकर देवराव उमरेडकर, रवी पराते,सुरेश भुंजे,यांच्यसह शेकडो हलबा बांधाव नारे-निर्दशने मध्ये सहभागी होते.






