spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आज रंगणार सुप्रसिद्ध गायक पवनदीप राजन अन् गायिका चेतना भारद्वाज यांच्या जादुई आवाजाची सुरेल मैफिल

– मनपा ‘गरोबा महोत्सव अंतर्गत’ संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन

 नागपूर :-  नागपूर नागपूर महानगरपालिकेद्वारा गरोबा महोत्सवांतर्गत संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता सरदार वल्लभ भाई पटेल कच्छीविसा मैदान लकडगंज येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक इंडियन आयडल फेम पवनदीप राजन आणि गायिका चेतना भारद्वाज यांच्या जादुई आवाजाची सुरेल मैफिल रंगणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम नि:शुल्क असून, नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन महापौर  निता ठाकरे आणि कार्यक्रमाचे संयोजक तथा सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी केले आहे.

कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर निता ठाकरे राहणार असून, या याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यसभा सदस्य माया इवनाते, विधान परिषद आमदार सर्वश्री अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, डॉ. परिणय फुके, कृपाल तुमाने, संजय भेंडे, डॉ. राजीव पोतदार, विधान सभा सदस्य आमदार सर्वश्री. डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, मोहन मते, विकास ठाकरे यांची उपस्थिती राहणार आहेत. तसेच विशेष मान्यवर म्हणून, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते तथा कार्यक्रमाचे संयोजक नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्ष नेते संजय महाकाळकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम., अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड, शिक्षण विशेष समिती सभापती संतोष लड्ढा, लकडगंज झोन सभापती महेश्वरी बिसेन, एआयएमआयएमचे गटनेता शकील पटेल, इंडिअन मुस्लिम लीगचे गटनेता असलम खान मुल्ला, शिवसेना (उबाठा) चे गटनेता किशोर कुमेरिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) गटनेता आभा पांडे, बहुजन समाज पार्टीच्या गटनेता हर्षला जैस्वाल, शिवसेनाचे गटनेता गणेश चार्लेवार, स्थानिक नगरसेवक बालू लारोकर, नगरसेविका अर्चना पडोळे, नगरसेवक अतुल कोटेचा यांची उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती उपायुक्त मंगेश खवले आणि क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांनी दिली.

 एक तासापूर्वी प्रवेश करा

गरोबा महोत्सव अंतर्गत आयोजित संगीत संध्या कार्यक्रमात नागरिकांना प्रवेश नि:शुल्क असणार आहे. प्रवेशाकरिता रसिक प्रेक्षकांना शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेले क्यू आर कोड स्कॅन करून त्यावर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी झाल्यावर पास उपलब्ध होईल. एका पास वर एका व्यक्तीला प्रवेश दिला जाणार असून पास असलेल्या रसिक प्रेक्षकांनी एकातासा पूर्वी प्रवेश घ्यावा असे आवाहन सत्तापक्ष नेते तथा कार्यक्रमाचे संयोजक  नरेंद्र बोरकर यांनी दिली.

Popular Articles