spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा अवमानाचा मोर्चा काढुन निषेध

कन्हान :- मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेव यांचा अवमानाचा निषेधार्थ कन्हान, कांद्री परिसरितील शैकडो सेवक, सेविकांनी कुलदीप मंगल कार्यालय येथुन कन्हान पोलीस स्टेशन पर्यंत बाबा जुमदेवजी यांच्या घोषणा देत शांति पूर्ण मोर्चा काढुन अवमान करणाऱ्या मुकेश प्रकाश सावरबांधे याचा निषेध करून त्याचे विरुद्ध कठोर कारवाई करण्यास निवेदन देऊन मागणी केली आहे.

सोमवार (दि.२९) सप्टेंबर रोजी रात्री ११.१४ वाजता दरम्यान गैरअर्जदार मुकेशकुमार सावरबांधे मो.नं. ९३५९२९०७८१ रा. बाम्हणी, तालुका. पवनी , जिल्हा भंडारा या तरुणाने आपल्या मोबाईलवर व्हाट्सएँप स्टेट्स ला परम पूज्य परमात्मा एक मंडळा चे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेव यांचा व्हिडियो बनवुन त्यांचाबद्दद्दल अश्लील भाषेत शिवीगाळ करुन त्यांचा अपमान केला. बाबा जुमदेव यांचा अपमान केल्यामुळे कन्हान, कांद्री परिसरितील शेकडो सेवक, सेविकांच्या भावना दुखवल्या आहेत.

या घटनेचा निषे धार्थ गुरुवार (दि.९) ऑक्टोंबर ला शेकडो सेवक, सेवि कांनी परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपुर अंतर्गत कन्हान, कंद्री, खंडाळा, जुनिकामठी, अजनी परिसरातील मार्गदर्शक अशोक मानकर यांच्या नेतृत्वात कुलदीप मंगल कार्यालय येथुन कन्हान पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढुन निषेध करण्यात आला.कन्हान पोलीस स्टेशन मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवुन मुकेश प्रकाश सावरबांधे यांचे विरुद्ध कठोर कारवाई करण्या ची मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी कन्हान मार्गदर्शक अशोक मानकर, कांद्री मार्गदर्शक नारायण मांडलेकर, संभाजी मस्के, बलवंत पडोळे, शालिक सहारे, शंकर राऊत, गंगाराम मरबते, शंकर लेंडे, अरुण हटवार, दौलत बर्वे, सेवकराम चौधरी, लीलाधर कुंभलकर, वसंतराव लोहकरे, गणेश सरोदे, दिपक कुंभलकर, प्रविण बावणकुळे, सारंग काळे, अजय मांढरे, संजय चौधरी, कृष्णा चौधरी, यशवंत आंबिलढुके, जयंत कुंभलकर, विलास वाडीभस्मे, रवि राणे, विष्णु गाढवे, गज्जु गोरले, प्रभाकर समरित, श्यामराव बावनकुळे, प्रकाश भोयर, नामदेव काबळे, सोनु बर्वे, सेविका रश्मी बर्वे, वर्षा मानकर, कल्पना कुंभलकर, सत्यफुला गाते, सुनदा राऊत, संगिता वांढरे, निर्मला मेश्राम, तुळसा मस्के, मालु आकरे, दुर्गा सरोदे सह शेकडो सेवक आणि सेविका बहु संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.