spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपाद्वारे ‘दिशा’ कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना विशेष मार्गदर्शन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ‘दिशा’ कार्यक्रमांतर्गत बेसलाईन मूल्यमापनात कमी कामगिरी दर्शविणाऱ्या शहरातील १६ शाळांतील एकूण ३२ शिक्षकांसाठी एक महत्त्वपूर्ण ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आली. याचा उद्देश शिक्षकांना पुढील शैक्षणिक वाटचालीसंदर्भात प्रेरित करणे आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या निकालात झपाट्याने सुधारणा घडवून आणणे हा होता.

याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. शिक्षणाधिकारी साधना सयाम,शाळा निरीक्षक सीमा खोब्रागडे, राजिया शाहीन, अंजुम आरा, विजय सोनी आणि सेवानिवृत्त शाळा निरीक्षक विजय वालदे यांच्यासह इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या विशेष बैठकीला मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या मनोगतात या चर्चेचे महत्त्व अधोरेखित केले. “शिक्षकांचा एकाग्र प्रयत्न विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासात सकारात्मक बदल घडवू शकतो,” असे सांगत त्यांनी शिक्षकांना प्रेरित केले. तसेच यांनी सर्व शिक्षकांना विशेषतः पुढील ४० दिवसांमध्ये विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या निकालात लक्षणीय सुधारणा घडविण्यासाठी लक्षपूर्वक आणि प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनीही शिक्षकांना प्रोत्साहन दिले. त्यांनी सकारात्मक ऊर्जेने काम करण्याचे आवाहन करत या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, शाळा निरीक्षक सीमा खोब्रागडे, राजिया शाहीन, अंजुम आरा, विजय सोनी आणि सेवानिवृत्त शाळा निरीक्षक विजय वालदे यांनीही शिक्षकांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील त्यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकांक्षा फाउंडेशनच्या शबाना अन्सारी, रिद्धी पोपट आणि सुरेंद्र वाघमारे यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.