spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तुमान गावातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी आज तहसील कार्यालय मौदा समोर कपडे काढू आंदोलन 

किशोर साहू, मौदा :- तुमान गावातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी तहसीलदार मौदा यांना वारंवार लेखी निवेदने देऊन व प्रत्यक्ष भेटून अतिक्रमण काढण्यात आलेला नाही. त्यामुळे उद्या सोमवार (ता. 9 जून)ला गट ग्रामपंचायत तुमान सरपंच धम्मजीत गजभिये यांच्या नेतृत्वात तुमान येथील गावकरी मौदा तहसील कार्यालय समोर सकाळी 11 वाजता कपडे काढू आंदोलन करणार आहे.

याबाबत शनिवार (ता. 7 जून)ला सरपंच धम्मजीत गजभिये यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनाही निवेदन दिले. मंत्री जयस्वाल यांनी तात्काळ 7 जूनलाच उपविभागीय अधिकारी, मौदा यांना 2 दिवसात कारवाई करण्याचे पत्र दिले. आज रविवार 8 जूनला नायब तहसीलदार नमूटे यांनी तुमान गावाला भेट देऊन फक्त मोक्का चौकशी केली. अतिक्रमण धारकांवर कोणतीच कारवाई करण्यात न आल्याने अतिक्रमण जैसे थे असल्याने, उद्या मौदा तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता तुमान येथील गावकरी कपडे काढू आंदोलन करणार आहेत, असे भ्रमणध्वनी वरून सरपंच धम्मजीत गजभिये यांनी सांगितले.

आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांमध्ये विकास चौधरी ,उमेश गायकवाड , पालेश्वर डडूरे, विजय गजभिये, शुभम पटिये, प्रल्हाद रंधाई, सुनील पटिये, अमोल चौधरी, दुर्गेश घोडमारे, संतोष चौधरी, अनिकेत चौधरी, अंकित खडसानं, रवी भिवगडे, बंटी चौधरी, तुषार रंधाई, आशिष चौधरी,इंद्रा चौधरी , अमित शेरकुरे, मयूर सोनवाने सह अतिक्रमण विरोधी इतरही गावकऱ्यांच्या समावेश आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.