नागपूर :- धनगर समाजातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 301 व्या जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी 31 मे रोजी सायंकाळी 7 वाजता ‘अहिल्या मंदिर’, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती, सौभाग्यनगर, हुडकेश्वर रोड, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात येणार आहे. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांचे स्वागत व मनोगत होईल. या कार्यक्रमाला राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ.विकास महात्मे, आमदार कृपाल तुमाने, महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हातीबेड, सभापती रूपाली ठाकूर, सभापती मंगला खेकरे, ज्योती देवघरे, नगरसेवक अजय बोढारे, योगेश मडावी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती नागपूर तसेच समस्त धनगर समाज बांधवांनी केले आहे.




