Home Latest News पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा 301 वा जयंती उत्सव 31 मे रोजी

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा 301 वा जयंती उत्सव 31 मे रोजी

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> धनगर समाजातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 301 व्या जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे&period; हा कार्यक्रम रविवारी 31 मे रोजी सायंकाळी 7 वाजता &OpenCurlyQuote;अहिल्या मंदिर’&comma; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती&comma; सौभाग्यनगर&comma; हुडकेश्वर रोड&comma; नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे&period; कार्यक्रमाची सुरुवात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात येणार आहे&period; त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम&comma; मान्यवरांचे स्वागत व मनोगत होईल&period; या कार्यक्रमाला राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे&comma; डॉ&period;विकास महात्मे&comma; आमदार कृपाल तुमाने&comma; महापौर निता ठाकरे&comma; उपमहापौर लिला हातीबेड&comma; सभापती रूपाली ठाकूर&comma; सभापती मंगला खेकरे&comma; ज्योती  देवघरे&comma; नगरसेवक अजय बोढारे&comma; योगेश मडावी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली असून&comma; समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी&comma; असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती नागपूर तसेच समस्त धनगर समाज बांधवांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version