spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मध्य नागपूरचे लोकप्रिय आमदार प्रवीण दटके ह्यांच्या संकल्पनेतून आमदार सांस्कृतीक महोत्सव समिती व महिला जागृती जनकल्याण बहुउद्देशिय संस्था ह्यांच्याद्वारे महिलांसाठी रास गरबा आयोजित करण्यात आला होता

नागपूर :- मध्य नागपूरचे लोकप्रिय आमदार प्रवीण दटके ह्यांच्या संकल्पनेतून आमदार सांस्कृतीक महोत्सव समिती व महिला जागृती जनकल्याण बहुउद्देशिय संस्था ह्यांच्याद्वारे दिनांक २५.०९.२०२५ ते २८.०९.२५ या कालावधीत संध्याकाळी ७ ते १० या वेळेत महिलांसाठी रास गरबा आयोजित करण्यात आला होता.

प्रथम दिवशी श्रीमंत राणी यशोधराराजे भोसले व श्रीमंत राणी माधुरी राजे भोसले व बुलढाणा जिल्हा चिखलीच्या आमदार श्वेता महाले पाटील, भाजपा महिला मोर्चा शहर अध्यक्ष दिव्या धुरडे यांचे हस्ते आरती करुन उद्घाटन करण्यात आले व दिनांक २७.०९.२५ रोजी सुप्रसिध्द अभिनेत्री तेजस्विनी पंडीत व दिनांक २८.०९.२५ रोजी सायली संजीव सुप्रसिध्द टिव्ही स्टार व अभिनेत्री यांनी महीलांसोबत गरबा खेळून महिलांचा उत्साह द्विगुणीत केला. मुसळधार पावसातही रास गरबा करुन महीलांनी नारीशक्तीचा परिचय दिला. प्रथम पारितोषीक २१,०००/चे शितलामाता ग्रुप ह्यांनी पटकावला व द्वितीय क्रमांक गंगादेवी ग्रुप तृतीय पारितोषीक स्वामीनी गरबा ग्रुप, यांना मिळाला बेस्ट ग्रुपचा सम्मान माऊली ग्रुप, वैष्णोदेवी ग्रुप, रॉकस्टार ग्रुप यांना मिळाला. सर्व मातृशक्तींनी आमदार प्रवीण दटके यांचे आभार मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रयत्न करणाऱ्या आयोजक अर्चना डेहनकर यांचेसह अनिता काशीकर, रेखा निमजे, श्वेता निकम, सरला नायक, निकीता पराये, कविता इंगळे, गीता पार्डीकर, सारिका नांदुरकर व आमदार सांस्कृतीक महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी सहकार्य केले.

Popular Articles