spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान नदीच्या काठावरील जुगार अड्डयावर धाड

– चार आरोपी अटक, कन्हान पोलीसांची कारवाई

कन्हान :- नदीच्या काठावर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर कन्हान पोलीसांच्या डीबी पथकाने धाड टाकली. कारवाईत चार आरोपीला ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन रोख रक्कमे सह एकुण १९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार सोमवार (दि.१६) मार्च ला दुपारी २ वाजता दरम्यान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर, उपनिरीक्षक प्रविण हारगुडे, पोहवा हरिष सोनभद्रे, अमित यादव, अश्विन गजभिये सह पोलीस कर्मचारी अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना कन्हान – पिपरी येथे कन्हान नदीच्या काठावर काही इसम ५२ ताश पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलीसांनी स्टाफसह घटनास्थळी धाड टाकली असता आरोपी १) मयुर सागर शेंडे वय २४ वर्ष, २) विरेन्द्र रविन्द्र पात्रे वय २४ वर्ष दोघे रा. सत्रापुर कन्हान, ३) अमन रामु पात्रे वय ३३ वर्ष रा. विष्णु लक्ष्मी नगर कन्हान, ४) शुभम नामदेव रंगारी वय २४ वर्ष रा. न्यु मार्केट पिपरी कन्हान हे ५२ ताशपत्तयांचा जुगार खेळतांना मिळुन आले. पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन ५२ ताशपत्ते रोख आणि रक्कम १९०० रूपये असा एकुण १९५०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कन्हान पोलीसांनी उपनिरीक्षक प्रविण हारगुडे यांचे तक्रारी वरून चार आरोपी विरूध्द १२ (अ) म जु का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Popular Articles