कन्हान बुध्द विहार येथे वर्षावास प्रारंभ : बुद्ध चरित्र आणि तथागत बुद्ध यांच्या धम्मदेशना ग्रंथाचे पठण
कन्हान १२ : कन्हान येथील गणेश नगर सिद्धार्थ कॉलनी येथील कन्हान बुद्ध विहार येथे आषाढी पौर्णिमा निमित्त वर्षावास कार्यक्रम गुरूवार (दि.10) जुलै रोजी कन्हान बौद्ध विहार येथे ‘बुद्ध चरित्र आणि तथागत बुद्ध यांच्या धम्मदेशना’ या ग्रंथाचे पठण करण्यात येत आहे. याचा शुभारंभ भदंत आर्य के.सी.एस.लामा यांच्या उपस्थितीत धम्म देसना, प्ररित्राण पाठ,आणि विहार परिसरात बोधि वृक्षारोपण करून वर्षावास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी बौध्द उपासक उपासिकांनी सहभाग घेतला.
या वर्षावासकार्यक्रमा करिता बुद्धिस्ट वेल्फेअर सोसायटी कन्हान व के.सी.एस लामा चॅरिटेबल ट्रस्टनेच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
याप्रसंगी कार्याध्यक्ष भगवान नितनवरे, विनायक वाघधरे, दौलत ढोके, शैलेश माटे,शालू गजभिये, सुदाम नितनवरे, आनंद चाहिंदे,पुंडलिक मानवटकर, गौतम खंडारे,चंद्रशेखर डोंगरे, राजेश फुलझेले, राजेन्द्र फुलझेले, गौतम नितनवरे, फुलवंता उके, सुजाता मेश्राम,पिंकी मेश्राम,जिजाबाई मानवटकर,गीता सतदेवे,नमिता फुलझेले, लता मंडपे,अर्चना फुलझेले, बबीता मानवटकर,अनिता दुपारे,दुर्गा गजभिये,अर्चना चव्हाण, शिला बागडे, रजनी कुंभारे, रजनी पाटील,सुजाता नारनवरे, कमला गटपाळे, सह बौद्ध उपासक, उपासिका उपस्थित होते.




