Home Latest News महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात २९० पदांची भरती; कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १४४ पदांसह विविध जागा

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात २९० पदांची भरती; कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १४४ पदांसह विविध जागा

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत असून एकूण २९० पदांची भरती आयबीपीएस मार्फत केली जाणार आहे&period; यासंदर्भातील सविस्तर जाहिरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर &lpar;www&period;mjp&period;maharashtra&period;gov&period;in&rpar; प्रसिद्ध करण्यात आली आहे&comma; अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>या भरतीत कनिष्ठ अभियंता &lpar;स्थापत्य&rpar; या पदासाठी सर्वाधिक १४४ पदे उपलब्ध असून त्याशिवाय कनिष्ठ अभियंता &lpar;यांत्रिकी&rpar;&comma; लिपिक&comma; तसेच इतर तांत्रिक व प्रशासकीय पदे देखील भरण्यात येणार आहेत&period; या भरती प्रक्रियेमुळे राज्यातील तरुण अभियंत्यांना आणि इतर पात्र उमेदवारांना शासन सेवेत संधी उपलब्ध होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की&comma; महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राज्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा व स्वच्छता योजना राबवते&period; या योजनांचे सक्षमीकरण करण्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती&period; त्यामुळे पारदर्शक पद्धतीने आयबीपीएस मार्फत ही भरती करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता&comma; वयोमर्यादा&comma; आरक्षण निकष&comma; तसेच अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे&period; उमेदवारांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर भेट देऊन आवश्यक माहिती व अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी&comma; असे आवाहन करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या भरतीमुळे राज्यातील पाणीपुरवठा प्रकल्पांच्या कामकाजाला गती मिळणार असून स्थानिक रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल&comma; असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version