spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विभागीय महिला लोकशाही दिन 9 मार्च रोजी

नागपूर :- विभागीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार, 9 मार्च 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारीचा निपटारा व अनुषंगिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. महिला लोकशाही दिनात अडचणी, गाऱ्हाणी व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रासंह सकाळी 11 ते 12 या वेळेत उपस्थित राहण्याचे महिला व बाल विकास नागपूर विभागाचे विभागीय उपआयुक्त यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

महिला लोकशाही दिनात अर्ज विहित नमुन्यात असावा, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे व तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा, यापूर्वी झालेल्या जिल्हा स्तरावरील महिला लोकशाही दिन समितीचा कार्यवाही अहवाल जोडणे आवश्यक असून याप्रमाणे लोकशाही दिनात तक्रारी स्विकारण्याचे निकष दिलेले आहेत. न्यायप्रविष्ट प्रकरणे, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबीचे अर्ज स्विकारले जाणार नसल्याचे महिला व बाल विकास नागपूर विभागाचे विभागीय उपआयुक्त यांनी सांगितले आहे.

Popular Articles