Home Latest News भिमा कोरेगावच्या यौद्धाचे स्मरण फुले, शाहू, आंबेडकरांच्या अस्मितेचा लढा भिम सैनिकांनी लढले...

भिमा कोरेगावच्या यौद्धाचे स्मरण फुले, शाहू, आंबेडकरांच्या अस्मितेचा लढा भिम सैनिकांनी लढले तर इतिहास विसरणार नाही – चरणदास गायकवाड

0
38

नागपूर :- पेशव्यांच्या वाईट चालीरितीला मुठमाती देऊन समतेचे बिगूल फुंकणारे महार सैनिक आज पण स्मरणात आहे त्याच धर्तीवर फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या भिम यौद्धा हा सुद्धा इतिहासात आपली स्मृती निर्माण करू शकतात असे प्रतिपादन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे जेष्ठ नेते चरणदास गायकवाड यांनी केले ते आज भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित भिम सैनिक दखल लो अभियान कार्यक्रमात बोलत होते प्रस्तुत अभियानाचे प्रारंभ आंरिमो चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले प्रा.रमेश दुपारे यांनी प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी सुप्रसिद्ध कवी तन्हा नागपुरी, देवेंद्र बागडे, यांनी भिमा कोरेगाव युद्धाचे स्मरण करून इतिहासाचे दाखले दिले ओबीसी नेते राजु पांजरे यांच्या वाढदिवस भिम यौद्धा दिवस म्हणून साजरा करण्यात आला सुरज ढोणे यांच्या हि सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पुण्यशील बोदिले यांनी केले कार्यक्रमात हंसराज उरकुडे,अजय तांबे, धर्माजी बागडे, शालिक बांगर, मनोहर इंगोले, उपस्थित होते.