spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सावनेर महामार्गावरील दुरुस्तीचे काम सुरू, ‘इनसाइडर न्यूज टुडे’च्या वृत्ताची दखल

खापा, वार्ताहर :- सावनेर-खापा-मनसर (५४७ इ) या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या लांबच लांब भेगांमुळे वाढलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अखेर संबंधित विभागाने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. रस्त्यावरील तांत्रिक त्रुटी, खोल तडे आणि बंद पथदिव्यांमुळे हा मार्ग नागरिकांसाठी धोकादायक ठरत होता. विशेषतः दुचाकीस्वारांना रात्री भेगांचा अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाण वाढले होते.

तातडीने ‘इनसाइडर न्यूज टुडे’ने ‘सावनेर-खापा-मनसर महामार्गाला तळे, अपघातात वाढ; वाहने पंचर व अपघाताचे प्रमाणही वाढले, राष्ट्रीय महामार्ग की मृत्यूच्या सापळा? पथदिवे बंद, या मथळ्याखाली बुधवारी (ता.२९) वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासन जागे झाले. संबंधित विभागाने त दखल घेत सावनेर उड्डाण पुलापासून कोदेगाव, खापा, कोथुळणा मार्गावरील भेगा बुजविण्याचे काम हाती घेतले. दरम्यान, २५ एप्रिल व २६ एप्रिलच्या मध्यरात्री या मार्गावर अपघातांची मालिका घडली होती. खापा पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. जब्बार गुलजार शेख (वय ४५, रा. खापा) हे कोदेगाव शिवारातील एच.पी. पेट्रोल पंपाजवळील भेगेत दुचाकी अडकून गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पत्नीलाही दुखापत झाली असून दोघांवर उपचार सुरू आहेत. या दुरुस्तीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, उर्वरित कामेही लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

Popular Articles