Home Latest News महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ ची परतफेड

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ ची परतफेड

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८&period;६७ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज&comma; २०२६ अदत्त शिल्लक रकमेची २३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत देय असलेल्या व्याजासह २४ फेब्रवारी २०२६ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल&comma; असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>&&num;8220&semi;परक्राम्य संलेख अधिनियम&comma; १८८१&&num;8221&semi; अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुट्टी जाहीर केल्यास&comma; राज्यातील अधिदान कार्यालय&comma; कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल&period; या कर्जावर २४ फेब्रुवारी २०२६ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही&period;<&sol;p>&NewLine;<p>सरकारी प्रतिभूती विनियम&comma; २००७ च्या उप-विनियम २४ &lpar;२&rpar; व २४ &lpar;३&rpar; अनुसार&comma; दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे&comma; इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल&period; रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी&comma; अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक&comma; बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास&sol;त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे&comma; त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील&period;<&sol;p>&NewLine;<p>तथापि&comma; बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या&sol;इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी&comma; नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी&comma; ८&period;६७ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज&comma; २०२६ च्या धारकांनी&comma; लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत&period; रोख्यांच्या मागील बाजूस प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली&comma; असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत&period;<&sol;p>&NewLine;<p>भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास&comma; ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत&comma; याची विशेष नोंद घेतली पाहिजे&period;<&sol;p>&NewLine;<p>रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना&comma; रक्कम स्वीकारायची असेल&comma; त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत&period; लोक ऋण कार्यालय हे&comma; महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात&sol;उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील&comma;असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version