spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कोदामेंढीत विविध ठिकाणी ध्वजारोहण करून गणराज्य दिन उत्साहात साजरा 

किशोर साहू मौदा ,ता.२८:- कोदामेंढी येथे विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून, शाळा व कॉन्व्हेंट मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून 77 वा गणराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

बाजार चौकात काँग्रेस सेवा दलातर्फे माजी सरपंच उमाकांत देवतळे यांच्या हस्ते, जि प प्राथमीक शाळा येथे प्रभारी मुख्याध्यापक रजनी काचुरे यांच्या हस्ते, साईबाबा पतसंस्थेत संस्थाध्यक्ष शिवराम बावनकुळे यांच्या हस्ते, जि प हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ज्येष्ठ शिक्षक सचिन अहिर यांच्या हस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. समीक्षा महल्ले यांच्या हस्ते, रेड्डी स्कॉलर कॉन्व्हेंट येथे माजी पंचायत समिती मौदा उपसभापती अशोक हटवार यांच्या हस्ते, भोयर कॉन्व्हेंट मध्ये प्रतिष्ठित नागरिक रामबाबू देवेनेनी यांच्या हस्ते,भारतीय ग्रामीण मंडळ द्वारा संचालित आदर्श प्राथमिक शाळेत संस्थेचे सचिव बी के मेश्राम यांच्या हस्ते, ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच आशिष बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी कोदामेंढी जि प सर्कल भाजपा क्लस्टर प्रमुख भगवान बावनकुळे, मौदा तालुका समन्वय समिती सदस्य नरेश बावनकुळे, भाजपा नागपूर जिल्हा मंत्री निलेश बावनकुळे,सेवा सहकारी संस्था अध्यक्ष विवेक देवतळे, माजी उपसरपंच प्रकाश भगवान मेश्राम, उपसरपंच गोपाल गिरमेकर, ग्रामपंचायत सदस्यगण विष्णू बावनकुळे, खुशाल शिवणकर, सदानंद मेश्राम, रवी ठवकर, अनिता हटवार, हेमा देवतळे, कोमल खडसे, अंजली मोहर्ले , स्वाती गौरखेडे , रूपाली ठाकरे, पोलीस पाटील प्रकाश देवतळे, माजी सरपंचा प्रतिभा विठ्ठल निकुळे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिक्षिका मोती कौशिक, हेमराज बावनकुळे, रेड्डी स्कॉलर कॉन्व्हेंट संचालक सत्यनारायण रेड्डी,प्रतिष्ठित नागरिक वसंतराव उरकुडकर, माऊली ग्रुपचे उद्योजक प्रल्हाद किंमतकर, सामाजिक कार्यकर्ते पिंटू पाटोळे, अतुल लिमजे, श्याम देवतळे, भैय्या बावनकुळे, पत्रकार संदीप गौरखडे, शैलेश वाघमारे, किशोर साहू सह गावातील इतरही गणमान्य नागरिक, महिला ,पुरुष ,बालगोपाल,शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थीगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles