spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दिवंगत मनीष डोंगरे यांना महसूल मंत्र्यांकडून श्रद्धांजली – कुटुंबीयांना दिला धीर

 

कामठी ०८ : प्रभाग १५, गौतम नगर छावणी येथील रहिवासी आणि बरिएमंचे सक्रिय युवा कार्यकर्ते मनीष डोंगरे यांचे १ जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. या दुःखद प्रसंगानंतर रविवार, ७ जुलै रोजी राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनीष डोंगरे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला.दिवंगत मनीष डोंगरे यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अत्यंत सक्रिय होते.

या वेळी भाजपा पदाधिकारी मंगेश यादव, माजी नगरसेविका संध्या रायबोले, विक्की बोंबले, राजेश खंडेलवाल, अरविंद चवडे, रोहित दहाट, उमेश जगणे, शंकर चवरे, दिनेश खेडकर, अनिल बोरकर, ऋषि वानखडे, पियूष दामले, संतोष यादव, प्रज्वल सौलंकी, लखन डांगे, नवीन खोब्रागडे, सुबोध चांदोरकर, अविनाश गजभिये, माधुरी गजबे, प्रिया चहांदे, शिल्पा नागदेवे, प्रगती शेंडे, प्रिया डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Popular Articles