spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठी तालुक्यातील 45 सरपंच पदाचे नव्याने आरक्षण जाहीर

 

कामठी ०८ :-कामठी तालुक्यातील 45 ग्रामपंचायत च्या आगामी पंचवार्षिक कालावधीसाठी सोडतीद्वारे सरपंच पदाचे आरक्षण तहसिलदार गणेश जगदाडे तसेच नायब तहसिलदार मयूर चौधरी यांच्या मुख्य उपस्थितीत जाहीर करण्यात आले. कामठी तालुक्यातील 45 ग्रामपंचायत पैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 7,अनुसूचित जमातीसाठी 2,नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 12,तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 24 ग्रामपंचायती प्रवर्गनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षित करण्यात आल्या.सोडतीद्वारे विविध प्रवर्गातील 50 टक्के सरपंच पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आले.
ग्रामपंचायत निहाय सोडतीद्वारे निश्चित करण्यात आलेले सरपंच पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे आहे.

अनुसूचित जाती महिला
पावनगाव,केम,वरंभा, चिकना,
अनुसूचित जाती-वारेगाव,कोराडी, चिखली
अनुसूचित जमाती महिला-गारला
अनुसूचित जमाती-तरोडी (बू)
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला-आवंढी, भिलगाव,खैरी, कापसी (बू),वडोदा, गादा,
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-उमरी,
लिहिगाव,
खसाळा,दिघोरी, बाबूलखेडा,
सोनेगाव (राजा)
सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असलेली गावे-भामेवाडा,घोरपड,
गुमथळा,गुमथी, जाखेगाव,
खापा,खेडी, नान्हा(मांगली),नेरी, शिवणी, सुरादेवी, बिना,आडका,आजनी,भोवरी,भुगाव,
लोंणखैरी,
कढोली,कवठा,केसोरी, महालगाव,
परसाळ, रणाळा, टेमसना  ही गाबे आरक्षित आहेत. या आरक्षण सोडतीत कामठी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांचा हिरामोड झाल्याचे दिसून आले


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.