spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

१ कोटी रुपये द्या २ कोटी रुपये देतो अशी बतावणी करून राईस मिल मालकाला गंडवले, गोंदिया शहरात घडला प्रकार

गोंदिया :- म्हणता ना लालच बुरी बला है याचा एका प्रत्यक्ष उदाहरण गोंदियात पाहायला मिळाला असून मध्यप्रदेशातील काही भामट्यानी गोंदिया जिल्याच्या आमगाव तालुक्यातील राईस मिल मालक बबलू लिल्हारे यांची एक कोटी रुपयाने फसवणूक केली आहे, या प्रकरणी गोंदिया पोलिसांनी मध्यप्रदेश राज्यातील ७ आरोपीना आता पर्यंत ताब्यात घेत सात लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे .मात्र १ कोटी रुपयाची रोख रक्कम घेऊन पड काढणाऱ्या आरोपीला अजूनही पोलीस पकडू शकले नाही.

मध्यप्रदेशातील हेमलता बैस या महिलेने गोंदिया शहरातील आपल्या मैत्रिणीला पैस्याचे आमिष देत तुमच्या जिल्यातिल व्यक्तीला १ कोटी च्या बदल्यात २ कोटी रुपये देऊ असे सांगत तुला देखील मोठी रक्कम मिळेल असे आमिष दिल्याने गोंदियातिल महिलेने देखील आपल्या ओळखीचा फायदा घेत राईस मिल व्यवसायिक बबलू लिल्हारे यांच्याशी संपर्क करीत एका कोटी रुप्याच्या १०० आणि २०० रुप्याच्या नोटा जमवून द्या माजी मैत्रीण तुम्हाला २ कोटी रुप्याच्या ५०० च्या नोटा बदल्यात देईल असे सांगत बबलू लिल्हारे याना विश्वासात घेत त्यांच्या कडून हेमलता बैस या महिलेला आणि तिच्या साथीदारांनच्या मदतीने १ कोटी रुप्याच्या १०० आणि २०० च्या नोटा पडवून नेत त्या बदल्यात चिल्ड्रन बँक म्हणजे FULL OF FUN म्हणजेच चूरन नोटा एका ट्रॅव्हलिंग ब्याग मध्ये भरून दिल्या .तर फिर्यादी याना हेमलता बैस यांच्यावर संशय आल्याने तुम्ही आमच्या सोबत चला तुम्ही दिलेल्या नोटा आम्ही मोजून काढू तेव्हाच तुम्ही परत जाऊ शकता असे सांगत आरोपी महिलेला आणि तिच्या मैत्रिणीला बबलू लिहारे यांनी आपल्या कार मध्ये बसवीत आमगाव येथील राईस मिल मध्ये घेऊन जात ट्रॅव्हलिंग ब्यागची तपासनी केली असता ब्याग उघडताच बबलू लिल्हारे याना आपली फसवून झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आरोपी महिलेला आणि तिच्या मैत्रिणीला आमगाव पोलिसांच्या ताब्यात देत गुन्हा दाखल केला आहे . या संदर्भात फिर्यादी बबलू लिल्हारे यांनी आपली बदनामी होईल म्हणून पोलिसांची सुरवातीला दिशा भूल करीत हेमलता बैस यांच्या माध्यमातून १० कंटेनर तांदूळ घेऊन त्या बदल्यात एक कोटी रुपये दिले असल्याचे पोलिसांना सांगितले तर महिलेने पैस्याच्या बदल्यात १० कंटेनर तांदूळ देनार असल्याचे सांगत फसवणूक केल्याचा बनाव बबलू लिल्हारे यांनी पोलिसानं समोर केला होता ,मात्र पोलिसांना देखील घटना स्थळावर पैस्याची झालेली हेराफेरी लक्षात येताच पोलिसांनी देखील खाकी वर्दीचा धाक दाखवून बबलू लिल्हारे यांच्या कडून सत्य जाणून घेतले असता बबलू लिल्हारे यांनी दिलेले १ कोटी रुपये हे १० कंटेनर तांदळाच्या बदल्यात नव्हे तर डबल मणी म्हणजे एक कोटी च्या बदल्यात दोन कोटी मिळणार असल्याचे बबलू लिल्हारे यांनी पोलिसांना सांगितले तेव्हा या घटने मागचा सत्य पोलिसानं समोर आला आणि पोलिसांनी आपली तपास चक्रे फिरविता हेमलता बैस यांच्या कडून त्यांच्या साथीदारांचा मोबाईल नंबर मिळवून घेत पोलिसांनी लोकेशन च्या आधारावर सात आरोपीना दोन वेग वेगळ्या ठिकाण वरून कार शह ताब्यात घेतले आहे.

तर आरोपीने बबलू लिल्हारे यांना विश्वशात घेत सांगितले होते कि आमच्या कडे मोठ्या प्रमाणात ब्ल्याक मणी आहे आणि लवकरच ५०० च्या नोटा बंद होणार असल्याने आम्ही एक कोटीच्या बदल्यात दोन कोटी रुपये देऊन आपल्या जवळील ब्ल्याक मणीच्या नोटा बंद होण्या आधी आम्ही ह्या नोटा बदलून देत आहोत त्यामुळे तुमच्या कडे १०० आणि २०० रुप्याच्या नोटा असतील तर आम्हाला द्या त्या बदल्यात आम्ही तुम्हाला दोन पट पैसे देऊ असे सांगत हेमलता बैस आणि तिच्या साथीदाराने मिळून बबलू लिल्हारे यांची फसवणूक केली आहे तर दुसरीकडे बबलू लिल्हारे यांनी १ कोटी रुपयांच्या १०० आणि २०० रुपयांच्या नोटा आणल्या कुठून याचा तपास गोंदिया पोलिस करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.