spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्थानिक युवा राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज बी.एड. (महिला) कॉलेज येथे साने गुरुजी यांची जयंती साजरी

पांढरकवडा :- युवा राष्ट्रसंत भैय्युजी महाराज बी.एड (महिला) कॉलेज येथे साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थी पायल कुंभारे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम वर्षीय प्रशिक्षणार्थीनी मनिषा आत्राम आणि मोनाली डोमडे यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाची सुरुवात ही सरस्वती माता व साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी विशाखा शेंडे यांनी स्वागत गीत सादर केले. द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थीनी पल्लवी कोर्रीवार, तारा आत्राम, स्वाती भसारकर यांनी प्रार्थना गीत सादर केले. प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी प्रतीक्षा बोबडे व द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थीनी स्नेहल गुल्हाणे, अश्विनी भोयर, साक्षी बेले, पदमिनाक्षी चव्हाण यांनी कविता सादर केली. द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थीनी वर्षा ठाकरे, साक्षी गंगशेट्टीवार यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी सुप्रजा रासमवार व द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थी तृप्ती भोयर यांनी चारोळी सादर केली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांनी साने गुरुजी यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाला बी.एड. प्रथम व द्वितीय वर्षीय प्रशिक्षणार्थीनी उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाचे संचालक श्याम अरके, डॉ. अंशु साहू, डॉ. सारिका निकम, प्रा. शेखर ख्रिस्ती, प्रा. पंकज आगलावे, प्रा. मनवर, प्रा. जपिंदरकौर कानसे, प्रा. जान्हवी भोयर, प्रा. नलिनी करपते व समस्त शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षीय प्रशिक्षणार्थीनी चैतन्या बोलचेट्टीवार व राणी निलगिरवार यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन द्वितीय वर्षीय प्रशिक्षणार्थीनी अक्षता गराड यांनी केले. प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी विशाखा शेंडे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Popular Articles