– नवनाथ बन यांचा घणाघात
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदीचे विचार मला पटवून सांगितले तर मी भाजपात प्रवेश करेन, असे म्हणणारे जनाब संजय राऊत सन 2014 ते 2019 मध्ये पार तोंड फुटेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे देशहितासाठी काम करत आहेत, हे जाहीर भाषणांमधून महाराष्ट्राला सांगत होते. संजय राऊतांना विस्मृतीचा आजार झाला असला तरी राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीचे केलेले कौतुक महाराष्ट्र विसरलेला नाही. 2019 नंतर मात्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आणि केवळ सत्ता मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार बाजूला ठेवला याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात भाजपा प्रदेश नवनाथ बन यांनी सोमवारी निर्भत्सना केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत सन 2014 ते 2019 या काळात तुम्ही जे काही भजन गात होता ते पंतप्रधान नरेंद्र मोदीसाठी होते. आज तुम्ही काँग्रेसचे गुणगान आणि राहुल गांधींचे भजन गाता आहात. कारण तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी हवी आहे. परंतु लक्षात घ्या, तुम्ही पूर्वी ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे तोंड भरून कौतुक होता हे महाराष्ट्र पुन्हा एकदा आठवतोय, याकडे बन यांनी लक्ष वेधले.
बन पुढे म्हणाले, संजय राऊत सांगताहेत की प्राजक्त तनपुरे यांच्या नावाने आंघोळ केली पाहिजे. पण तुमच्या नावाने महाराष्ट्र रोज सकाळी आंघोळ करतोय. तुमच्या पक्षाला खड्ड्यात घालण्याचे काम तुमच्यामुळेच झाले आहे. भाजपाचा विचार पटल्याने भाजपात येणाऱ्यांचे आम्ही स्वागत करणार. उबाठा गटात काळा कुत्राही यायला तयार नाही. आज उबाठाचे शेकडो कार्यकर्ते उबाठा सोडून शिंदे सेनेत, भाजपात येतात. भाजपाची ताकद वाढत असेल तर आम्ही ती वाढवणार. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा राष्ट्रभक्तीचा विचार हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी भाजपा कार्यरत आहे.
ज्या काँग्रेसने लाडकी बहीण योजना बंद झाली पाहिजे म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्या पक्षाचे विजय वडेट्टीवार आज लाडकी बहिण योजनेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या योजनेच्या नावावर लाडक्या बहिणींची कुणी फसवणूक केली असेल तर अशांवर कारवाई करण्याचे काम सरकारच्या माध्यमातून केले जातेय. दीड हजार रुपये घेऊन तुम्ही लाडक्या बहिणींना विकत घेताहात असे आरोप करत लाडक्या बहिणींचा अपमान करण्याचेच काम महाविकास आघाडीने केले, असे म्हणत बन यांनी कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नसल्याचे ठासून सांगितले.








