spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान व अमर नगर मंडळाची तीर्थक्षेत्र दर्शन सहल उत्साहात

नागपूर :- ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूर आणि अमर नगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी धापेवाडा, आदासा व कोराडी या तीर्थक्षेत्रांची दर्शन सहल उत्साहात आयोजित करण्यात आली. या सहलीत ५९ ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होत अध्यात्मिक वातावरणाचा आनंद घेतला. सहली दरम्यान भाविकांनी धापेवाडा येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर आदासा येथील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिराला भेट दिली. विदर्भातील जागृत शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात दर्शन घेतल्याने सहभागी ज्येष्ठ नागरिकांना आध्यात्मिक समाधान लाभले. ही सहल ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव राजूजी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अमर नगर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देविदास आगरकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली. सहल यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सचिव वसंतराव इझनकर, उपाध्यक्ष गणपतराव निंबाळकर, रमेश जिल्हारे, डॉ. राजेश कुऱ्हाडे, विलास वाकडे, भोयर, शोभा आगरकर, निंबाळकर, इझनकर, रासेकर आणि ढोले यांनी विशेष परिश्रम घेतले.

धार्मिक स्थळांच्या दर्शनासोबतच ज्येष्ठ नागरिकांमध्ये परस्पर संवाद, स्नेह आणि आपुलकी वृद्धिंगत होण्यास या सहलीमुळे मोठी मदत झाली. अशा प्रकारच्या तीर्थक्षेत्र दर्शन सहली नियमितपणे आयोजित करण्यात याव्यात, अशी अपेक्षा सहभागी भाविकांनी व्यक्त केली.

Popular Articles